Bigg Boss Marathi 5: नुसता राडा अन् हाणामारी... पहिल्याच आठवड्यातच बिग बॉसच्या घरात धुमाकूळ! 

रोहिणी ठोंबरे

02 Aug 2024 (अपडेटेड: 02 Aug 2024, 06:24 PM)

Big Boss Marathi 5 Janhvi Killekar vs Aarya Jadhav :  'बिग बॉस मराठी'चा 5 वा सीझन सुरू होऊन फक्त 6 दिवस झाले आहेत आणि तरीही या 6 दिवसांत नुसता राडा आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव एकमेकींना भिडल्या आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

'बिग बॉस मराठी'चा 5 वा सीझन सुरू होऊन फक्त 6 दिवस झालेत.

point

या 6 दिवसांत नुसता राडा आणि भांडणं पाहायला मिळत आहेत.

point

नव्या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव एकमेकींना भिडल्या आहेत.

Big Boss Marathi 5 Janhvi Killekar vs Aarya Jadhav :  'बिग बॉस मराठी'चा 5 वा सीझन सुरू होऊन फक्त 6 दिवस झाले आहेत आणि तरीही या 6 दिवसांत नुसता राडा आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. ही भांडणं साधीसुधी नसून हाणामारीपर्यंत पोहोचत आहेत. पहिल्याच दिवसापासून हा शो प्रचंड चर्चेत आहे. आता नव्या प्रोमोमध्ये आणखी एक वाद रंगताना पाहायला मिळत आहे. घरातील दोन स्पर्धकांमध्ये शाब्दिक वार होत असताना त्यांचा हा वाद मारामारीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. (bigg-boss marathi 5 update in new promo of colors marathi rapper arya jadhav and actress janhavi killekar are seen fighting)

हे वाचलं का?

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा एक नवा धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव एकमेकींना भिडल्या आहेत. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचेही दिसत आहे. तसेच जान्हवीने आर्यावर हात उचलला आहे. जान्हवी आणि आर्याचे भांडण चांगलेच पेटले आहे. आता पुढे काय होऊल हे नवा एपिसोड पाहूनच सनजेल.

हेही वाचा : PV Sindhu: भारताचं हक्काचं पदक हुकलं; पॅरिस ऑलिंपिकमधून पीव्ही सिंधूची एक्झिट!

जान्हवी-आर्यामध्ये नेमकं काय बिनसलं?

प्रोमोची सुरुवात जान्हवीपासून होते. किचनमध्ये असलेली जान्हवी म्हणते, "नॉमिनेशन कार्यात आर्या किती फडफड करत होती." त्यावर आर्या म्हणते, "माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका." तर जान्हवी आर्याला बोलते, "तु किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच मी बघते." त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. आर्या आणि जान्हवी प्रोमोमध्ये भिडलेल्या पाहून 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू!

नॉमिनेशनच्या पहिल्या टास्कनंतर आता घरातील सदस्यांमध्ये खटके उडू लागले आहेत. नॉमिनेशनच्या टास्क दरम्यान झालेली डील तसेच नॉमिनेट करण्यासाठी दिलेली कारणे अशा सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घरातील काही सदस्यांमध्ये वाद निर्माण झालेले दिसत आहेत.

  

    follow whatsapp