Mahesh Manjrekar : "मी चवताळलेल्या माणसासारखा...", मांजरेकरांच्या मुलीसोबत काय घडलेलं?

मुंबई तक

• 04:11 PM • 26 Apr 2024

Mahesh Manjrekar Reaction on Social Media Trolling : ''मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा.लोकं म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा, पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष का करायचं? कुणी दिला हक्क तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक चित्रपट बनवतो, तो तुम्ही पाहिला. तुम्ही तो पाहण्यासाठी पैसे मोजले. त्यामुळे त्याबद्दल बोलायचा तुम्हाला हक्क आहे.

mahesh manjrekar actor director angry reaction on social media trolling juna furniture movie release

लोकं म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा, पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष का करायचं?

follow google news

Mahesh Manjrekar Reaction on Social Media Trolling : प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याला त्याच्या मुलाच्या (जहांगिर) नावावरून प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगनंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही, असा मोठा निर्णय चिन्मयने घेतला होता. मराठी सिनेसृष्टीत हे प्रकरण ताजे असतानाच आता प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी ट्रोलिंगवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ''मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन'' असे वक्तव्य मांजरेकर यांनी केले आहे. (mahesh manjrekar actor director angry reaction on social media trolling juna furniture movie release) 

हे वाचलं का?

महेश मांजरेकर यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी वरील विधान केले आहे.सोशल मीडियावर कलाकारांपासून सर्वसामान्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगवर बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की,  ''मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा.लोकं म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा, पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष का करायचं? कुणी दिला हक्क तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक चित्रपट बनवतो, तो तुम्ही पाहिला. तुम्ही तो पाहण्यासाठी पैसे मोजले. त्यामुळे त्याबद्दल बोलायचा तुम्हाला हक्क आहे, असे मांजरेकर यांनी म्हटले. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा 'कार्यक्रम' ?

पण मला सिनेमा आवडला नाही आणि माझे पैसै फुकट गेले किंवा मला सिनेमा आवडला आणि माझे पैसै वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटीव्हली क्रिटिसाईज केलं तर माझं काहीचं म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि तुमच्या आवडीचा मी आदर करतो. पण मी एखादी पोस्ट केली की माझे आई, वडील, माझी मुलगी, बायकोला बोलायचा कोणालाही हक्क नाही. त्यामुळे मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून काढत कानफटवेन, अशी संतप्त प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली. 

महेश मांजरेकर यांनी यावेळी ट्रोलिंग संदर्भातला एक किस्साही सांगितला. एकदा तर माझ्या मुलीबद्दल सोशल मीडियावर खूप वाईट लिहलं होतं. मी त्या व्यक्तीला शोधलं आणि त्याच्या विरोधात तक्रार केली. तसेच अशा लोकांना का माफ करायचे, असे देखील मांजरेकर यांनी म्हटलं. सोशल मीडियावर होणारी ही ट्रोलिंग थांबवण्यासाठी एक कायदा करणे गरजेचे असल्याचे देखील मांजरेकर यांनी म्हटलं आहे. 

    follow whatsapp