ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
सध्या आपल्या कामातून ब्रेक घेऊन जान्हवी मस्त सुट्टीचा आनंद घेत आहे.
यावेळी जान्हवीने तिच्या हातावर एक टॅटू देखील बनवला आहे.
तिच्या टॅटूमध्ये लिहलं आहे की, I love you my labbu त्यामुळे labbu नेमकं कोणं? असा सवाल तिचा सोशल मीडियावर विचारला जात आहे.
या टॅटूमध्ये labbu म्हणून जे कोरलं आहे. ते दुसरं-तिसरं कोणी नसून जान्हवीच्या आई स्वर्गीय श्रीदेवी हिचं नाव आहे.
आपल्या आईची आठवण म्हणून तिने हे टॅटू गोंदवलं असल्याचं बोललं जात आहे.
सध्या जान्हवी कपूर ही आपल्या मैत्रिणींसोबत ट्रेकिंगचा आनंद घेत आहे.
नुकतेच तिने आपल्या ट्रेकिंगचे काही फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.
जान्हवी कपूर ही हळूहळू बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करत असून सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
सध्या जान्हवीकडे गुड लक जेरी आणि दोस्ताना 2 सारखे मोठ्या बॅनरचे प्रोजेक्ट्स आहेत.
ADVERTISEMENT