बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा दिसणार अजय देवगण Vs अजय देवगण

मुंबई तक

• 08:51 AM • 27 Jan 2021

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसाठी 2021 हे फार बिझी वर्ष असणार आहे. अजयचे अनेक सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत. या सिनेमांच्या लिस्टमध्ये मैदान आणि आरआरआर या बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे. मात्र या दोन सिनेमांमुळे अजय एका अडचणीत सापडलाय. पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर अजय देवगण Vs अजय देवगण असं पहायला मिळणार आहे. अजय देवगणचे हे दोन्ही सिनेमे […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसाठी 2021 हे फार बिझी वर्ष असणार आहे. अजयचे अनेक सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत. या सिनेमांच्या लिस्टमध्ये मैदान आणि आरआरआर या बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे. मात्र या दोन सिनेमांमुळे अजय एका अडचणीत सापडलाय. पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर अजय देवगण Vs अजय देवगण असं पहायला मिळणार आहे.

हे वाचलं का?

अजय देवगणचे हे दोन्ही सिनेमे या वर्षी आक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहेत. यामध्ये बोनी कपूर यांचा मैदान हा सिनेमा 15 ऑक्टोबर रोजी रिलीज होणारे तर बाहुबलीचे दिग्दर्शकांची आरआरआर हा सिनेमा दोन दिवस अगोदर म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात येण्याची घोषणा करण्यात आलीये. या दोन्ही सिनेमांमध्ये अजय देवगण यांची भूमिका महत्त्वाची असल्याने बॉक्स ऑफिसवर अजय देवगण स्वतःशीच टक्कर घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान यावरून बोनी कपूर मात्र नाराज असल्याचं समजतंय. बोनी कपूर यांनी आरआरआर मेकर्सशी अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या मताप्रमाणे, बाहुबली आणि बाहुबली 2 सारखे सिनेमे तयार करणाऱ्या दिग्दर्शकाला सिनेमा रिलीज करण्यासाठी एखादा सण किंला वीकएंडची गरज नाहीये. दरम्यान अजय देवगणने आरआरआरच्या रिलीज डेटची पोस्ट रिट्विट केलेली नाही.

बोनी कपूर यांनी सिनेमा पुढे ढकलण्यास देखील नकार दिला आहे. 15 ऑक्टोबर रोजी मैदान सिनेमा रिलीज होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

    follow whatsapp