आली लग्न घडी समीप…!; आलिया-रणबीरचा समारंभ सुरू… भट्ट, कपूर कुटुंबीय लग्नस्थळी

मुंबई तक

• 07:54 AM • 13 Apr 2022

आता सगळीकडे आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या सेलिब्रेटी कपलचं लग्न कधी होणार याविषयी उत्सुकता असताना. आता नवीन माहिती समोर आली आहे. १३ एप्रिल आणि १४ एप्रिल या २ दिवसातच आलिया आणि रणबीरचा लग्नसमारंभ होणार आहे… त्याप्रमाणे तयारीला सुरवात झाली आहे. मुंबईमधील जुहु इथल्या वास्तू अपार्टमेंटमध्येच आलिया आणि रणबीरचे अपार्टमेंट आहेत.. हे दोनही […]

Mumbaitak
follow google news

आता सगळीकडे आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या सेलिब्रेटी कपलचं लग्न कधी होणार याविषयी उत्सुकता असताना. आता नवीन माहिती समोर आली आहे. १३ एप्रिल आणि १४ एप्रिल या २ दिवसातच आलिया आणि रणबीरचा लग्नसमारंभ होणार आहे…

हे वाचलं का?

त्याप्रमाणे तयारीला सुरवात झाली आहे. मुंबईमधील जुहु इथल्या वास्तू अपार्टमेंटमध्येच आलिया आणि रणबीरचे अपार्टमेंट आहेत.. हे दोनही अपार्टमेंटमध्ये कालपासून रोषणाई करण्यात आली आहे. तसेच वास्तू अपार्टमेंटच्या गेटवरही मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली आहे. १३ एप्रिल म्हणजे आज सकाळपासूनच या लग्नसमारंभात उपस्थित राहण्यासाठी पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली आहे. वास्तूच्या गेटसमोर बँरिकेटस लावण्यात आले आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजल्यापासून गणेश पूजनाला सुरवात झाली आहे. यानंतर दुपारी दीड वाजता मेंहदी फंक्शनला सुरवात होणार आहे. तसंच उद्या १४ एप्रिलला काही निवडक निमंत्रीत पाहुण्यांच्या उपस्थितीत रणबीर आणि आलियाचं लग्न होणार आहे. तसंच थेट १६ एप्रिलला रणबीर आणि आलिया याचं ग्रँड रिसेप्शन मुंबईतच होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

    follow whatsapp