बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान स्वतः अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबबाबत माहिती दिली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
शनिवारी रात्री त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे चाहत्यांना माहिती दिलीये. ‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ असं ब्लॉकच्या माध्यमातून सांगत त्यांनी प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. मात्र अमिताभ यांच्या या छोट्या वाक्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमिताभ यांच्यावर शस्त्रक्रिया का होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
अमिताभ यांचा हा ब्लॉग पाहिल्यावर चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केलीये. इतकंच नव्हे तर अमिताभ यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे देखील चाहते संभ्रमात पडले आहेत. ट्विटरच्या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्रश्नार्थक चिन्ह लिहीली आहेत. त्यामुळे अमिताभ पुढे काय माहिती देतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.
नुकतंच अमिताभ यांनी त्यांचा झुंड हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचसोबत चेहरे हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ यांनी या दोन्ही सिनेमांचं पोस्टर सोशल मिडीयावरून शेअर केलं होतं. तर बिग बी ब्रम्हास्त्र या सिनेमात देखील झळकणार आहेत.
ADVERTISEMENT