बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म डिरेक्टर सध्या इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी काल इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्मक टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तापसी आणि अनुराग यांची चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांचीही जवळपास सहा तास चौकशी केली. इन्कम टॅक्सकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारावर अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग आणि तापसीच्या घरांवर जी छापेमारी करण्यात आली आहे ती आणखीन 3 दिवस सुरु असण्याची शक्यता आहे. कारण इन्मक टॅक्सवर अधिका्यांना बर्याेच डिजिटल कागदपत्रं गोळा करायची असून त्यासाठीच वेळ लागत असल्याची माहीती आहे.
फँटम फिल्मशी संबंधित सेलिब्रेटींच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाने बुधवारी छापे टाकले. इन्कम टॅक्स विभागाने बुधवारी या दोघांच्या मुंबई आणि पुण्यातील घर आणि ऑफिस याठिकाणी छापेमारी केली. यावेळी सर्च ऑपरेशनमध्ये काही कागदपत्र, लॅपटॉप तसंच इतर अनेक इलेक्ट्रिनिक वस्तूंची तपासणी केली. काल दुपारपासून इन्कम टॅक्सचं पथक या मालमत्तांची तसंच कर चोरी प्रकरणाचा तपास करतंय.
दरम्यान सीएएचा मुद्दा असो किंवा शेतकरी आंदोलन असो तापसी आणि अनुराग कश्यपने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. यासंदर्भात तापसी आणि अनुरागने ट्विट करत सरकारला टोले लगावले होते. तर केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतल्यामुळेच अनुराग आणि तापसीवर इन्मक टॅक्स विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याचं काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटलंय.
2011 मध्ये अनुराग कश्यप, मधु मंटेना, विक्रमादित्य मोटवानी तसंच विकास बहल यांनी फॅंटम फिल्म्स कंपनी तयार केली होती. तर ऑक्टोबर 2018मध्ये फॅंटम फिल्मस बंद देखील झाली.
ADVERTISEMENT