बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अभिनयाच्या क्षेत्रात फार सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रीय आहे. वामिकाचा जन्म झाल्यानंतर तिचा चेहरा पाहण्यासाठी विराट आणि अनुष्काचे चाहते खूपच आतुर झाले आहेत. परंतु आपल्या मुलीची ओळख दर्शवणारा फोटो सध्या तरी शेअर न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. अर्थात असे असले तरी विराट आणि अनुष्का लेकीचा चेहरा दिसणार नाही, असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतातच. या फोटोंवरही त्यांचे चाहते भरभरून कमेन्ट करत असतात.अनुष्काने दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर वामिकासोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अर्थातच या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही परंतु अनुष्काच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. अनुष्काने फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी भरभरून कमेन्ट करायला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर अनेक कलाकारांनीही त्यावर कमेन्ट केली आहे.
ADVERTISEMENT
अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले की, ‘दिवसागणिक तू माझ्यापेक्षा जास्त साहसी होत चालली आहे. तुझ्यामध्ये देवी मातेची ताकद येवो… माझी प्रिय वामिका…’ या दोघींचा हा सुंदर फोटो पाहून रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, जेनेलिया डिसुजा, ताहिरा कश्यप, सुनील शेट्टी, अथया शेट्टी यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेन्ट केल्या आहेत. रणवीरने ‘ओह ले’ असे म्हणत हार्टचे खूप सारे इमोजी शेअर केले.त्याशिवाय प्रियांका चोप्राने देखील कमेन्ट केली. प्रियांकाने रणवीर आणि अनुष्कासोबत ‘दिल धडकने दो’ सिनेमात काम केले होते. या तिघांमध्ये खूप छान बाँडिंग आहे. एकेकाळी अनुष्का आणि रणवीर हे एकमेकांच्या खूप जवळ होते. परंतु आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचा खुलासा केला होता.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का हे सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे चाहत्यांचे फार बारकाईने लक्ष असते. जानेवारी २०२१ मध्ये वामिकाचा जन्म झाला. सध्या अनुष्का वामिकासोबत संपूर्ण वेळ घालवत असली तरी, लवकरच ती सिनेमात सक्रीय होणार आहे. अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचे तर तिच्याकडे काही प्रोजेक्ट आहेत. भलेही ती सध्या सिनेमात सक्रीय दिसत नसली तरी तिच्या निर्मिती संस्थेतर्फे वेब सीरिजची निर्मिती केली जात आहे.
ADVERTISEMENT