प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या आत्महत्या प्रकरणात आता खालापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात नितीन देसाई यांची मोठी मुलगी मानसी देसाईने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात तिने संबंधित कंपनीने खोटी आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. याचसोबत वडिलांचा फसवणूक करण्याचा कोणताच उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.
ADVERTISEMENT
मानसी देसाईने एएनआयशी बोलताना सांगितले की, वडील नितीन देसाईंवर कर्जाची रक्कम 181 कोटी रुपये होती. त्यापैकी आम्ही 86.31 कोटी रुपये भरले होते. फेब्रुवारी 2020 पर्यंत सर्व देयके देण्यात आली होती. तसेच वडिलांचा कुणालाही फसवण्याचा उद्देश नव्हता,अशी माहिती मानसीने दिली आहे. तसेच माझ्या निवेदनाचा इतकाच उद्देश आहे की, नितीन देसाई यांच्या संबंधित अफवांना आळा घालणे, लोकांना चुकीची माहिती पसरवणे थांबवणे आणि जगासमोर सत्य समोर आणणे असे असल्याचे मानसीने सांगितले.
हे ही वाचा :Jalgaon: ‘त्या’ नराधमाला गावात आणताच तुफान राडा, चिडलेल्या गावकऱ्यांनी तर..
नितीन देसाई यांच्यावर 181 कोटी रूपयांचे कर्ज होते. त्यापैकी आम्ही 86.31 कोटी रूपये भरले होते. फेब्रुवारी 2020 पर्यंत आम्ही सर्व कर्जाचे हफ्ते भरले होते. तसेच कंपनीने नितीन देसाई यांच्याकडे 6 महिन्याचा इंटरेस्ट अॅडव्हान्स देखील मागितला होता. ही रक्कम वडिलांनी पवईचे ऑफिस विकून दिली होती. कोणाचीही फसवणूक करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता आणि त्यांनी घेतलेले सर्व पैसे ते परत करणार होते असे देखील मानसी देसाईने सांगितले.
मानसी देसाई पुढे म्हणाली की, 2020 साठी आलेल्या कोरोना महामारीचा संपूर्ण जगाला धक्का बसला होता. बॉलिवूडलाही याचा मोठा फटका बसला. कारण त्यावेळी कोणतीच कामे सूरू नव्हते आणि स्टूडिओ देखील बंद होते. त्यामुळे वडिलांना नियमीत कर्जाचे हफ्ते भरता येत नव्हते, हफ्ते भरण्यास विलंब होत होता, असे मानसी म्हणाली. या सर्व प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी नितीन देसाई यांनी कपंनीला वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यांच्याकडील रक्कम त्यांना पुन्हा परत करता येईल. पण कंपनीने त्यांना खोटे आश्वासन देऊन बाजूने कायदेशीर कारवाई सुरू केल्याचा आरोप मानसी देसाईने केला.
हे ही वाचा :बॉलिवूड गाजवलं, पण शेवट झाला खूपच वाईट…; ‘या’ कलाकारांचे झाले प्रचंड हाल
आम्ही प्रसारमाध्यमांना विनंती करतो की त्यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्ये करणे थांबवावे, चुकीची माहिती पसरवणे थांबवावे. कोणतीही माहिती जारी करण्यापूर्वी आमचा सल्ला घ्या, असे आवाहन मानसीने प्रसिद्धी माध्यमांना केले. तसेच मी महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करते आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार एनडी स्टुडिओचा कार्यभार स्वीकारावा. आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेवटी मानसी देसाईने सरकारकडे केली आहे.
ADVERTISEMENT