अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच बळी या हॉरर सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. तर आता या सिनेमाचं अजून एक पोस्टर रिलीज झालेलं आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे नवं पोस्टर शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
स्वप्नीलने शेअर केलेल्या बळी सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये एक जखमी हात स्वप्नीलच्या गळ्याभोवती आवळलेला दिसतोय. तर स्वप्नीलच्या डोक्यावर रक्ताचे डाग दिसून येतायत. बळी सिनेमाच्या या पोस्टरवर देखील एलिझाबेथ कोण आहे एलिझाबेथ? असं लिहिण्यात आलंय. या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.
या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो,“यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”
ADVERTISEMENT