पैठणी देऊन बांदेकर भावोजींनी केला कतरीनाचा सन्मान

मुंबई तक

• 05:40 AM • 20 Oct 2021

महाराष्ट्राचं महावस्त्र ‘पैठणी’ देऊन आदेश बांदेकर यांनी ‘होम-मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्ष तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये बांदेकर भाओजींनी चक्क एका बॉलिवूड मधल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कतरीना कैफ आहे. हो हे खरं आहे. कतरीनाने तिच्या अभिनय […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचं महावस्त्र ‘पैठणी’ देऊन आदेश बांदेकर यांनी ‘होम-मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्ष तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये बांदेकर भाओजींनी चक्क एका बॉलिवूड मधल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कतरीना कैफ आहे. हो हे खरं आहे. कतरीनाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरातील तिच्या चाहत्यांना भुरळ पडली आहे. नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली त्यावेळी भावोजींनी कतरीनाचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत, महाराष्ट्राचं महावस्त्र तिला भेट देऊन केलं. इतका मोठा सन्मान दिल्याने त्या क्षणी कतरीना भारावून गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंदचं सगळं काही सांगून जातो. हा सोहळा आणि हा सन्मान क्षण प्रेक्षकांना शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये पाहायला मिळेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp