Bhojpuri actress akanksha dubey suicide case : भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे (akanksha dubey) हिच्या आत्महत्येच्या घटनेला आठवडा ओलांडला आहे, मात्र पोलिासांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही. या प्रकरणात समर सिंह आणि संजय सिंह यांच्यावर आकांक्षाच्या आईने आरोप केले होते. मात्र या आरोपानंतर देखील पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही आहे.त्यामुळे माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर मीही आत्महत्या करेन, अशा इशाराच आकांक्षाची आई मधु दूबे हिने दिला आहे. (bhojpuri actress akanksha dubey suicide case mother madhu dubey anger)
ADVERTISEMENT
आकांक्षा दुबे (akanksha dubey) हिची आई मधु दुबे या 1 एप्रिलला वाराणसीच्या पोलिस कार्यालयात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. लवकरात लवकर आम्ही या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेऊ. वाराणसी पोलिस समर सिंहच्या मागावर आहे, लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल असे आश्वासन वाराणसी पोलिस कमिश्नर मुथा अशोक जैन यांनी दिले आहे.
हे ही वाचा : आकांक्षानंतर आणखीण एका अभिनेत्रीची आत्महत्या,गूढ अवस्थेत सापडला मृतदेह
पोलिसांवरच गंभीर आरोप
मधु दुबे यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडून सतत वेळ मागितली जात आहे. मी त्यांना वेळ देतेय, पण कारवाई अद्याप करण्यात आली नाही.त्यामुळे मी पोलिसांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे. मी आतापर्यंत जितक्याही लोकांवर आरोप केले, त्याच्यापैकी एकालाही यांना अटक करण्यात आली नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.यासोबतच आता मधु दुबे यांनी न्यायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. जर मुख्यमंत्री माझ्या मुलीला न्याय देतील, जर तेही न्याय देऊ शकलेन नाही, तर मीही आत्महत्या करेन, असा थेट इशाराच त्यांनी देऊन टाकला आहे.
प्रकरण काय?
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (akanksha dubey) हिचा वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल सोमेंद्र रेसिडेन्सीमधील रुम नंबर 105 मध्ये लटकलेला मृतदेह आढळून आला. आकांक्षा हिचा मृतदेह तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुरुवातीपासून पोलीस या प्रकरणाचा आत्महत्येचा तपास करत होते. मात्र आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी ही आत्महत्या म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि या हत्येचा ठपका भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर ठेवला.
हे ही वाचा : Akanksha Dubey आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप
आकांक्षाच्या (akanksha dubey) आईने आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांना जबाबदार धरले. त्याचवेळी दोघांनी आकांक्षाचे पैसे रोखल्याचा आरोप करण्यात आला. मधूने हत्येमागचे कारण सांगितले की, दोघांनी आकांक्षा दुबेच्या कामाच्या बदल्यात करोडो रुपये दिले नाहीत आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आकांक्षाच्या आईचे म्हणणे आहे की समर आणि संजयने तिला पैसे द्यायचे नसल्याने तिची हत्या केली.
दरम्यान या प्रकरणात आता पोलिस आरोपीला किती दिवसात अटक करण्यात यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT