Gangster Lawrence Bishnoi: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज अभिनेता लॉरेन बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या नंबरवर

NIA On Gangster Lawrence Bishnoi:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिद्दीकींच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन बिश्नोईचा हात असल्याचं सूत्रांकडून समजते आहे

Gangster Lawrence Bishnoi Hitlist

Lawrence Bishnoi On NIA

मुंबई तक

13 Oct 2024 (अपडेटेड: 13 Oct 2024, 12:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लॉरेन बिश्नोई गँगने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली मोठी कबुली

point

लॉरेन बिश्नोई एनआयएच्या कबुली जबाबात नेमकं काय म्हणाला?

point

लॉरेन बिश्नोईच्या गँगमध्ये किती शूटर्स?

NIA On Gangster Lawrence Bishnoi:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिद्दीकींच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन बिश्नोईचा हात असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. बिश्नोईने राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठी कबुली दिल्याची माहिती समोर आलीय. बॉलिवूड अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे, असं बिश्नोईने एनआयएला सांगितलं होतं. सलमान खान हिटलिस्टमध्ये नंबर वन असल्याचं बिश्नोईनं कबुल केलं होतं.

हे वाचलं का?

लॉरेन बिश्नोईच्या गँगकडून सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून  बिश्नोई गँगमधील आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि पनवेल येथील फार्महाऊसवर हे शूटर रेकी करत होते, अशी माहिती समोर आली होती. 

हे ही वाचा >> Baba Siddique: राजकीय प्रवास ते बॉलिवूड कनेक्शन! बाबा सिद्दीकींबद्दल माहित नसलेल्या 'त्या' गोष्टी...

सलमान खान लॉरेन बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या नंबरवर असल्यांच बिश्नोईने एनआयएला सांगितलं होतं. 1998 मध्ये सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जोधपूरमध्ये काळवीटची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळवीटची पूजा करतो. याच कारणामुळे लॉरेन सलमानची हत्या करण्याचा प्रयत्न करतोय.

लॉरेन्सने त्याचा जवळचा मित्र आणि शूटर संपत नेहराला सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी सर्वात आधी पाठवलं होतं. परंतु, हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारखंच लॉरेन्स बिश्नोईने त्याची गँग सुरु केली आहे. एनआयएने आरोपत्रात खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग अनेक राज्यात पसरली आहे. त्याच्याकडे 700 हून अधिक शूटर्स आहेत. एनआयएने दावा केला आहे की, बिश्नोई आणि त्याची गँग अशाप्रकारे वाढत आहे, ज्याप्रकारे 1990 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने गँगवार सुरु केला होता.

हे ही वाचा >> Baba Siddique : 'बाबा सिद्दीकी' यांची हत्या करणारे ते तीन शूटर्स कोण? Photo आला समोर

    follow whatsapp