लठ्ठपणामुळे ट्रोल झालेल्या या अभिनेत्री, ऐश्वर्यालाही सोडलं नाही ट्रोलर्सने

मुंबई तक

• 05:57 PM • 24 Nov 2021

अभिनेत्री रुबीना दिलैक हिला नुकतंच तिच्या वाढत्या वजनामुळे सोशल मीडियावर काही जणांनी ट्रोल केलं आहे. रुबीना ही काही लठ्ठपणामुळे ट्रोल झालेली एकमेव अभिनेत्री नाही. याआधीही अनेक अभिनेत्रींना अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं. ऐश्वर्या राय-बच्चन हीचं वजन प्रेग्नंसीनंतर वाढलं होतं. तेव्हा देखील काही यूजर्सने तिला ट्रोल केलं होतं. सोनीक्षी सिन्हा हिला देखील तिच्या वाढलेल्या वजनामुळे […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री रुबीना दिलैक हिला नुकतंच तिच्या वाढत्या वजनामुळे सोशल मीडियावर काही जणांनी ट्रोल केलं आहे.

रुबीना ही काही लठ्ठपणामुळे ट्रोल झालेली एकमेव अभिनेत्री नाही. याआधीही अनेक अभिनेत्रींना अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं.

ऐश्वर्या राय-बच्चन हीचं वजन प्रेग्नंसीनंतर वाढलं होतं. तेव्हा देखील काही यूजर्सने तिला ट्रोल केलं होतं.

सोनीक्षी सिन्हा हिला देखील तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केलं जातं.

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी सोनाक्षी ही ओव्हरवेट होती. तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे शाळेत देखील चिडवलं जायचं.

हुमा कुरैशी हिला देखील वाढलेल्या वजनामुळे अनेकदा ट्रोल केलं जातं.

लठ्ठपणावरुन सर्वाधिक कोणाला ट्रोल केलं जात असेल तर ते अभिनेत्री विद्या बालन हिला केलं जातं.

विद्या बालन हिला हार्मोनल इश्यू होते. त्यामुळे वाढतं वजन ही तिची समस्या होती.

अभिनेत्री अलियाना डिक्रूज हिला देखील कधी काळी लठ्ठपणामुळे ट्रोल व्हावं लागलं होतं.

इलियाना ही डिस्मॉरसफिक डिसऑर्डरची शिकार झाली होती. ज्यामुळे तिचं वजनही वाढलं होतं.

ती वयाच्या बारा वर्षापासून या समस्येला तोंड देत आहे.

    follow whatsapp