अभिनेत्री सना खानने बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर मुफ्ती अनस यांच्याशी लग्न करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. सनाच्या लग्नाला जवळपास दोन महिने झालं असून बॉलिवूडपासून दूर असूनही सध्या ती पुन्हा चर्चेत आलीये. सनाचं पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिची इन्स्टाग्रामवरील पोस्ट…सनाच्या लग्नानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलं तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं. यानंतर सनाच्या म्हणण्याप्रमाणे एका व्यक्तीने तिच्याबद्दल निगेटीव्ह व्हिडीयो तयार केला असून तिचा भूतकाळ कसा होता हे सांगितलंय. शिवाय तिच्याबद्दल तो वाईटही बोलला आहे. या व्हिडीयो पाहून सना दुःखी झाली असून याला प्रत्युत्तर म्हणून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
ADVERTISEMENT
सना तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “काही लोकं गेल्या काही काळापासून माझ्यावर निगेटीव्ह व्हिडिओ बनवतायत. यावर आतापर्यंत मी गप्प बसले होते. पण आता एका व्यक्तीने माझ्यावर एक व्हिडिओ बनविला असून त्यामध्ये माझ्या भूतकाळावर भाष्य करण्यात आलं. इतकंच नाही तर ती व्यक्ती माझ्याबद्दल वाईटही बोलतेय. तुम्हाला हे माहीत नाही का की असं करणं पाप आहे. कारण तुम्ही ज्या व्यक्ती विषयी असं बोलताय त्या व्यक्तीने यापूर्वीच तौबा केलाय. तो व्हिडीयो पाहून मला फार वाईट वाटलंय.”
या पोस्टसह सनाने कॅप्शनही दिलंय. मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही कारण त्याने जे केलंय तेच मला करायचं नाहीये. ही वाईट वृत्ती आहे. जर तुम्ही एखाद्याला पाठिंबा देऊ शकत नाही तर किमान त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नका आणि शांत रहा. अशा प्रकारच्या कमेंटमुळे कोणाला डिप्रेशनमध्ये टाकू नका. तुम्ही काही गोष्टी विसरून पुढे जात असाल, पण काही लोकं माझ्यासारखी देखील असतात जे विचार करतात, कदाचित त्या काळात जाऊन सर्व गोष्टी बदलू शकू. प्लीज चांगलं रहा आणि लोकांना त्यांच्या वेळेनुसार बदलू द्या, असं सनाचं म्हणणं आहे.
सध्या सनाची ही पोस्ट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झालीये. सनाने ऑक्टोबर 2020 मध्ये मानवतेची सेवा करण्यासाठी आणि ‘इस्लाम’साठी इंडस्ट्री सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. ग्लॅमरच्या दुनियेतून बाहेर पडल्यानंतर 20 नोव्हेंबर रोज गुजरातच्या मुफ्ती अनस सईदशी ती विवाहबंधनात अडकली.
ADVERTISEMENT