ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
ती नेहमीच आपल्या स्टायलिश फोटोने आपल्या चाहत्यांचं लक्ष वळवून घेते.
साराने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती आपल्या मित्रांसह हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये मजा मस्ती करताना दिसते आहे.
साराने हे फोटो शेअर करुन कॅप्शन दिलं आहे की, हे फोटो पाहून मला त्या पर्वतरांगाची खूप आठवण येत आहे.
साराने असंही म्हटलं आहे की, ‘ती या डोंगररांगांना खूपच मिस करत आहे.’
साराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील फारच आवडले आहेत.
सारा, अक्षय आणि धनुष यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘अतरंगी रे’ हा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे.
या सिनेमातील साराच्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT