सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस लवकरच कलर्स मराठीवर

मुंबई तक

• 07:06 AM • 02 Feb 2021

कोरोना नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं… गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं… पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय… महाराष्ट्राचा सुपरस्टार सुमीत राघवन!! आणि रसिकांची टेन्शन्स दूर करण्यासाठी हास्याचा ‘अनलॅाक’ करत कॅामेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे, कलर्स मराठीवर!! […]

Mumbaitak
follow google news

कोरोना नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं… गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं… पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय… महाराष्ट्राचा सुपरस्टार सुमीत राघवन!! आणि रसिकांची टेन्शन्स दूर करण्यासाठी हास्याचा ‘अनलॅाक’ करत कॅामेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे, कलर्स मराठीवर!! अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे, एका धम्माल विनोदी शो सह या “सुपरफास्ट कॅामेडी एक्सप्रेस्” ची सूत्रं सांभाळणार आहे, रसिकांचा लाडका, अष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन! हिंदी चित्रपट, मालिका तसंच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केलीयत. यापूर्वी मराठी टेलिव्हिजन वर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शो चा सलग सूत्रसंचालक म्हणून या शो द्वारे कार्यक्रमाची एकहाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार असून त्याच्यातील संवेदनशील, गुणी, हजरजबाबी कलावंताचे विविध पैलू या शोमधून उलगडले जाणार आहेत.

हे वाचलं का?

कॅामेडीच्या या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दमदार अवलिया कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतील. आपल्या धमाल अभिनयाने हास्याची धुंवाधार आतषबाजी करण्याची … तर कधीकधी हसतांहसतां प्रेक्षकांच्या मनाला पाझर फोडण्याची ताकद या कलावंतांच्या अभिनयात आहे. प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर म्हणजेच नंदकिशोर चौघुले, माधवी जुवेकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, अभिजीत चव्हाण, शशिकांत केरकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, प्रथमेश शिवलकर, शर्मेश बेतकर, “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमधील तात्या अर्थात अक्षय टांक, मंदार मांडवकर, दिशा दानडे यांच्या सारख्या एकापेक्षा एक सरस आणि दमदार विनोदनिर्मिती करणाऱ्या नामांकित हास्यसम्राटांबरोबरच तितक्याच दमदार विनोदी संहिता लेखकांची दमदार खेळी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे सारखा हरहुन्नरी कलावंत, रंगभूमीवर वावरणारा रंगकर्मी या शोचं लेखन, दिग्दर्शन सांभाळणार आहे.

    follow whatsapp