अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यावर मुंबई महापालिकेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींच्या बिल्डिंगमध्ये पालिकेने आता कोव्हिड टेस्टिंग कँप सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन आरटीपीसीआर टेस्ट करणार आहे. पालिकेकडून करीना कपूर कपूर आणि अमृता अरोराच्या बिल्डिंग परिसरात आजूबाजूचा भाग संपूर्णतह सॅनिटाईझ केला आहे. करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्यापासून आयसोलेशनमध्ये आहे. पालिकेकडून करीना आणि अमृता अरोराच्या दररोज हेल्थ अपडेट घेतला जाणार आहे.
करीना कपूर आणि अमृता अरोरा सोबतच माहीप कपूर आणि सीमा खान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या चौघीहीजणी एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. या चारही जणींनी गेल्या काही दिवसात बऱ्याच पार्टी अटेंड केल्या होत्या. बॉलीवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्यापासून महापालिका अजून सतर्क झाली आहे. करीनाने सोमवारी सोशल मिडीयावर पोस्ट करत तिची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती दिली होती.
ADVERTISEMENT