Dancing On The Grave : आता लवकरच रंजक आणि सस्पेन्स किलरवर आधारित डॉक्युमेंट्री सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडिया टुडे ओरिजिनल्सचा बहुप्रतिक्षित ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 15 एप्रिल रोजी याचा एक पोस्टर समोर आला. ही डॉक्यूमेंट्री म्हैसूर राजघराण्यातील माजी दिवाण यांची नात शाकीरा खलीली हिच्या हत्येवर आधारित आहे. हा एक असा हत्याकांड होता जो डॉक्युमेंट्रीमधून पाहून एखाद्याला घाम फुटेल.
ADVERTISEMENT
‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ ही डॉक्युमेंट्री एका सत्य घटनेवर आधारित आहे. याला एकूण चार भागांमध्ये बनवण्यात आले आहे. पॅट्रिक ग्राहम या व्यक्तीने या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले आहे. गुन्हेगारीवर आधारित असणाऱ्या या डॉक्युमेंट्री सीरीजमध्ये असे दाखण्यात आले आहे की, 30 वर्षापूर्वी शाकीरा खलीली अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या पतीने तिला जिवंतच गाढले होते. तिची ही हत्या 90 च्या दशकात करण्यात आली होती. त्यावेळी ती अचानक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली होती. डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये या हायप्रोफाईल प्रकरणाशी संबंधित लोकांचे म्हणणे दाखवले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सीरिजमध्ये आरोपी स्वामी श्रद्धानंदच्या (शकीराचा नवरा) म्हणण्यासह तो स्वत:ला कसा निर्दोष सांगतो हे ही दाखवण्यात आले आहे.
BJP: ‘जीवात जीव असेपर्यंत मी..’ अजित पवारांकडून एक घाव दोन तुकडे!
‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ भारतासह जवळजवळ 240 देशांमध्ये 21 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम केली जाईल. यापूर्वी आलेली इंडिया टुडे ओरिजिनल्सची ‘इंडियन प्रिडेटर – डायरी ऑफ अ सीरियल किलर’ ही सीरिज चांगलीच गाजली होती.
शाकीरा खलीली कोण होती? सविस्तर वाचा
शाकीरा खलीलीचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. ती व्यावसायाने रिअल इस्टेट डेव्हलपर होती. 1991 मध्ये ती अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी तिचा पती स्वामी श्रद्धानंद होता. त्याच्यासोबत शाकीराने दुसरे लग्न केले होते. जेव्हा ती 18 वर्षांची होती तेव्हा तिचे पहिले लग्न तिचा चुलत भाऊ अकबर मिर्जा खलीलीसोबत झाले होते. लग्नानंतर तिला 4 मुले झाली. पण हा प्रेमविवाह फार काळ टिकला नाही. 1984 मध्ये तिने पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतला आणि सहा महिन्यातच तिने स्वामी श्रद्धानंदसोबत दुसरे लग्न केले. तिला चार मुलींनंतर एक मुलगा हवा होता.
‘अजित पवारांना घेरण्याची गरज नाही’, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
शाकीराच्या मुली तिच्या दुसरऱ्या लग्नाच्या विरोधात होत्या. तीन मुलींनी तिच्याशी बोलणे बंद केले होते. पण चौथी मुलगी सबा शाकीराच्या संपर्कात होती. तिलाही स्वामी श्रद्धानंद फारसे आवडत नव्हते. स्वामींना शाकीराच्या संपत्तीचा लोभ होता. त्यामुळेच त्याने पैशासाठी पत्नीची हत्या केली.
शाकीराची हत्या केल्यानंतर स्वामी श्रद्धानंदने तिचा मृतदेह स्वतःच्या घरात पुरला. गाढताना शाकीरा जिवंत असल्याचे दिसले. पण त्याने जिवंतच तिला पुरले. स्वामीने जिथे शाकीराला पुरले होते तिथे पार्टीचे आयोजनही केले होते. या हत्येप्रकरणी स्वामी आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाने स्वामी श्रद्धानंदला फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली.
ADVERTISEMENT