प्लाझ्मा दान करण्यास मिलिंद सोमणला डॉक्टरांनी दिला नकार, कारण..

मुंबई तक

• 07:42 AM • 18 May 2021

देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनाही त्याची लागण झालीये. असाच फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमणला देखील कोरोना झाला होता. त्यानंतर डाएट आणि व्यायामाच्या जोरावर त्याने कोरोनावर मात केली. पूर्णपणे बरे झाल्यानंतर मिलिंदने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय़ घेतला. मात्र डॉक्टरांनी नकार दिल्यामुळ त्याला तसं करता आलं नाही. मिलिंद मुंबईतील एका […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनाही त्याची लागण झालीये. असाच फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमणला देखील कोरोना झाला होता. त्यानंतर डाएट आणि व्यायामाच्या जोरावर त्याने कोरोनावर मात केली. पूर्णपणे बरे झाल्यानंतर मिलिंदने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय़ घेतला. मात्र डॉक्टरांनी नकार दिल्यामुळ त्याला तसं करता आलं नाही.

हे वाचलं का?

मिलिंद मुंबईतील एका रुग्णालायात प्लाझ्मा दान करण्यासाठी गेला होता. मात्र डॉक्टरांनी प्लाझ्मा घेण्यास नकार दिल्याने त्याला निराश होऊन परतावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद म्हणतो, “पुन्हा जंगलात परतलो आहे, प्लाझ्मा दान करण्यासाठी गेलो होतो मात्र पुरेशा अँटीबॉडीज नाहीत.”

मिलिंद त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “प्लाझ्मा थेरपी पूर्णपणे उपयोगी आहे असं नाही पण उपचारांसाठी त्याचा उपयोग नक्कीच होतो. तेव्हा मी विचार केला, जे करणं मला शक्य आहे ते करू. कमी अँटीबॉडीज म्हणजे मला सौम्य कोरोनाची लक्षणं होती. ती इतर आजारांशी लढण्यासाठी पुरेशी आहेत. मात्र इतरांची मदत करू शकत नाही याचं थोडं वाईट वाटलं.”

मिलिंदची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. मिलिंद सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. त्याच्या फिटनेसचे व्हिडीयो तसंच फोटो तो पोस्ट करत असतो.

    follow whatsapp