Gautami Patil: सातारा: राज्यातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने आज (16 मे) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील (Satara) जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, गौतमी पाटीलने उदयनराजेंना एक खास भेट देखील दिली. ज्याबाबत तिने स्वत:च माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं. (famous dancer gautami patil met chhatrapati udayanraje bhosale on this occasion she also gifted a special perfume)
ADVERTISEMENT
गौतमी पाटीलने उदयनराजेंना नेमकं काय गिफ्ट दिलं?
उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली की, ‘महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले.. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले होते.’ असं गौतमी यावेळी म्हणाली. तसेच या भेटीत खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्यूम भेट दिल्याचंही तिने सांगितलं
उदयनराजेंच्या भेटीनंतर गौतमी नेमकं काय म्हणाली?
‘मी पहिल्यांदाच महाराजांना भेटले.. त्यांचा खूप छान स्वभाव आहे आणि खरं तर त्यांना कलाकारांची जाण आहे. म्हणून या गोष्टीचं खूप छान वाटलं. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि कायम सोबत राहावा हीच विनंती करते. त्यासाठी मी आले होते. त्यांना भेटले छान वाटलं..’
‘मी बुके आणला होता राजेंच्या भेटीसाठी.. आणि मला या दादांनी सांगितलं होतं की, उदयनराजेंना परफ्यूम खूप आवडतो. मग मी परफ्यूम घेतला आणि तो उदयनराजेंना दिला.’
हे ही वाचा >> गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ अन् अल्पवयीन मुलासह एकाला अटक
‘उदयनराजे हे खूप मोठे आहेत.. त्यांच्या बरोबरीने माझं नाव घेऊ नका.. मी खूप लहान आहे. त्यामुळे तशी काही बरोबरी करू नका. मी एक कलाकार आहे आणि ते आपलं दैवत आहेत.’ असं गौतमी यावेळी म्हणाली.
गौतमीच्या अदांवर, महिलाही झाली फिदा
दरम्यान, गौतमी पाटीलच्या अदाकारींची सर्वांनाच भुरळ पाडली असताना गौतमी पाटीलच्या नृत्यावरती आता महिलाही थिरकू लागल्या आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यात एक महिला गौतमी पाटीलच्या अदाकारीवर थिरकत असताना गौतमी पाटीलच्या डान्सला प्रतिउत्तर देत ही महिला हि गौतमी पाटील सोबत थिरकली आहे. यावेली गौतमीने देखील या महिलेचे स्वागत करत तिचे कौतुक केले आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हे ही वाचा >> Gautami Patil : गौतमी पाटीलवर बार्शीत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?
गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रभर आपल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे करत आहेत. त्यामुळे अवघ्या राज्यभरात तिचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्यातच आता तिने थेट उदयनराजेंची भेट घेत त्यांना परफ्यूम गिफ्ट दिल्याने ती अधिकच चर्चेत आली आहे.
ADVERTISEMENT