अखेर तांडव प्रकरणावर अॅमेझॉन प्राईमने मागितली माफी

मुंबई तक

• 10:24 AM • 03 Mar 2021

अभिनेता सैफ अली खानच्या तांडव वेब सिरीजमुळे मोठा वादंग माजला होता. यानंतर सिरीज आणि सिरीजच्या कलाकारांवर समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भाच यापूर्वी सिरीजचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर अली अब्बास जफर यांनी माफी मागितली होती. त्यानंतर आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीयो यांच्या द्वारे देखील एक ऑफिशीयल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. अॅमेझॉनने दिलेल्या […]

Mumbaitak
follow google news

अभिनेता सैफ अली खानच्या तांडव वेब सिरीजमुळे मोठा वादंग माजला होता. यानंतर सिरीज आणि सिरीजच्या कलाकारांवर समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भाच यापूर्वी सिरीजचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर अली अब्बास जफर यांनी माफी मागितली होती. त्यानंतर आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीयो यांच्या द्वारे देखील एक ऑफिशीयल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

अॅमेझॉनने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, अॅमेझॉन प्राईमला अत्यंत दुःख आहे की नुकत्याच रिलीज केलेल्या तांडव या काल्पनिक सिरीजमधील काही दृश्य आपत्तीजनक वाटली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. या गोष्टी आम्हाला समजल्यावर त्या दृश्यांना लगेत हटवण्यात आलं. आम्ही प्रेक्षकांच्या श्रद्धांचा आदर करतो. आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो.

अॅमेझॉनच्या माफीनाम्यापूर्वी अली अब्बास जफरने सोशल मीडियावर माफीनामा पोस्ट केला होता. यावेळी त्यांनी देखील ‘सिरीज पूर्ण काल्पनिक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं माफीनाम्यातून सांगितलं होतं.

तांडव ही नऊ भागांची वेबसीरीज आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, झिशान अयूब, हितेन तेजवानी तसंच अनुप सोनी हे कलाकार यांच्या भूमिकेत आहेत. या सिरीजच्या पहिल्या भागात झिशान अयर शंकर बनलेला असून यावरील एका दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. यामुळे हिंदू देव-देवतांचा अपमान असल्याचं म्हणणं आहे.

    follow whatsapp