मिताली मयेकर आणि सुयश टिळक स्टारर असलेला हॅशटॅग प्रेम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून एक नवी आणि आगळीवेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात हॅशटॅग जमान्यातील ही प्रेमाची कथा असणार आहे
ADVERTISEMENT
हॅशटॅग प्रेम हा सिनेमा येत्या 19 मार्च रोजी रिलीज होणार आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एक नवी जोडी आणि प्रेमाची केमिस्ट्री या सर्व गोष्टी ‘हॅशटॅग प्रेम’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतायत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुयश आणि मिताली या दोघांची मैत्री आणि प्रेमाचं नातं याची एक झलक दाखवण्यात आली आहे.
निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनअंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर याचं दिग्दर्शन राजेश जाधव यांनी केलं आहे. नुकतंच या सिनेमाचं एकं गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्यात मितालीचा बोल्ड तसंच बिंधास्त अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. याचा ट्रेलर रिलीज झाला असून सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.
ADVERTISEMENT