बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. अक्षय कुमारचा आगामी पृथ्वीराज हा सिनेमा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे हा सिनेमा रिलीज होण्याच्या २ दिवस आधीच हा सिनेमा पाहणार आहेत.“आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शाह, भारतमातेच्या शूर पुत्रांपैकी एक, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवशाली जीवनावरील महाकाव्याचे साक्षीदार होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ज्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांची जीवनगाथा ते पाहणार आहेत.१ जूनला दिल्लीत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग केले जाणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अमित शाह यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री आणि दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.
ADVERTISEMENT