Honey Singh : Bollywood : बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंगवर सध्या संकटाचे ढग दाटले आहेत. कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने हनी सिंगला व्हॉईस नोटद्वारे धमकी दिली आहे. अशा स्थितीत हनी सिंगच्या (Honey Singh) कार्यालयाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला ही तक्रार देण्यात आली आहे. यानंतर हनी स्वत: दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचला. या व्हॉईस नोटची चौकशी करून, विशेष कक्ष या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. (Honey Singh was threatened by gangster Goldie Brar)
ADVERTISEMENT
याबाबत हनी सिंगने पोलिसांना सांगितले की, 19 जून रोजी त्याला त्याचा मॅनेजर रोहित छाबरा याच्या फोनवर धमकीचा कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव गोल्डी ब्रार असे सांगितले आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर त्याच्या मॅनेजरला त्याच नंबरवरून खंडणीसाठी रँडम कॉल आणि व्हॉईस मेसेज आला. ज्यावेळी या प्रकरणाची तक्रार आली त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. पीएस स्पेशल सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
रक्ताचं नातं असून साताऱ्याचे दोन्ही राजे सारखे का भिडतात? इतिहासातच आहे उत्तर!
हनी सिंगला मिळालेल्या धमकीत नेमकं काय?
गोल्डी ब्रार या व्यक्तीकडून आलेल्या धमकीच्या व्हॉईस नोटचा हनी सिंगने मीडियासमोर उल्लेख केलेला नाही. यासोबतच वेळ आल्यावर सर्व काही सांगू असे त्याने सांगितले होते. हनी सिंग म्हणाला की, ‘मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. कोणीतरी मला आणि माझ्या स्टाफला फोन केला होता. त्या व्यक्तीने गोल्डी ब्रार अशी त्याची ओळख सांगितली. मी सीपी सरांना मला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे. मला खूप भीती वाटते.’ कोणत्या धमक्या आल्या आहेत, असं विचारलं असता तो म्हणाला, ‘मी हे सर्व आता उघड करू शकत नाही. मी सर्व गोष्टींचा सल्ला घेईन आणि तुम्हाला माहिती देईन. मी सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत.’
‘मला जीवे मारण्याची भीती वाटते’- हनी सिंग
या घटनेने हनी सिंग पूर्णपणे हादरला आहे. यावर पुढे तो म्हणाला की, ‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं आहे. लोकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. अशी धमकी पहिल्यांदाच आली आहे. मला खूप भीती वाटते. माझं संपूर्ण कुटुंबं घाबरलं आहे. मरणाची भीती कोणाला वाटत नाही. मलाही सर्वात जास्त भीती मृत्यूचीच वाटते. मला परदेशी नंबरवरून फोन आल्यामुळे सुरक्षा-संरक्षणाची एवढीच मागणी मी पोलिसांकडे केली आहे.’
शरद पवारांच्या खेळीने अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्ये ‘कार्यक्रम’ झालाय?
गोल्डी ब्रारचे कॅनडा कनेक्शन
गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गोल्डी ब्रारचे नाव समोर आले. जो सध्या फरार आहे. पोलीस गोल्डीचा शोध घेत आहेत. हनीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याचे शेवटचे ठिकाण कॅनडा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतविंदरजीत सिंग आहे. तो भारत आणि कॅनडामधून फरार आहे. जिथे भारतातील पंजाब पोलिसांना त्याच्याविरुद्ध इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीआधीच आप-काँग्रेसचं बिनसलं, काय टाकली अट?
त्याचवेळी त्याला कॅनडातून 15 वॉन्टेडच्या यादीत ठेवण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोईचा गोल्डी ब्रार खास माणूस असल्याचे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार तो गुंडांची टोळी कॅनडातूनच चालवतो. गोल्डीने हनी सिंगच्या आधी बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने मार्च 2023 मध्ये सलमानला ईमेल पाठवून धमकी दिली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमानच्या घराची सुरक्षा वाढवली होती. हनी सिंगला धमकी मिळाल्यानंतर बॉलिवूडमध्ये हे दुसरे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT