सध्या अभिनेत्री कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. तर आता कंगना एका पॉलिटीकल चित्रपटात भूमिका साकारणार असल्याने चर्चेत आलीये. नुकतंच कंगनाने या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
ADVERTISEMENT
कंगनाने नुकतंच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलाईवी’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. आणि त्यानंतर आता ती इंदिरा गांधी यांच्या भूमिका करणार आहे. मात्र अजूनही या सिनेमाचं नाव माहिती नाहीये.

कंगना रानौत डेलीच्या ट्विटनुसार, “या प्रोजेक्टवर काम करत असून लवकरच याची स्क्रिप्ट पूर्ण होईल. ही फिल्म इंदिरा गांधी यांची बायोपिक नाही तर एका मोठ्या कालावधीची फिल्म असणार आहे. ही फिल्म आजच्या पिढीला देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीबाबत नीट माहिती देईल.” या ट्विटवर लिहीताना कंगना म्हणते, “मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला या आयकॉनिक महिलेच्या गेटअपमध्ये फोटोशूट केलेलं. मला माहिती होतं की एक दिवस आयॉनिक लीडरची भूमिका स्क्रिनवर साकारेन याची.”
दुसरीकडे कंगनाने धाकड या अॅक्शन सिनेमाचं शूटिंग सुरू केलंय. शिवाय काही दिवसांपूर्वीच तिने क्वीन ऑफ कश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिद्दायांच्यावर आधारित मणिकर्णिका रिटर्न्स या सिनेमाचीही घोषणा केली होती.
ADVERTISEMENT