करण जोहर म्हणतो सहा आठवडे घरामध्‍ये? मी एक तासही माझ्या फोनशिवाय राहू शकत नाही

मुंबई तक

• 09:31 AM • 07 Aug 2021

करण जोहर हे स्‍वत: सर्वात मोठा वादग्रस्‍त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे चाहते आहेत. म्‍हणून ‘बिग बॉस ओटीटी’चा होस्‍ट बनणे हे या दिग्‍गज चित्रपटनिर्मात्यासाठी स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. हा शो टेलिव्हिजनवर प्रिमिअर होण्‍यापूर्वी ८ ऑगस्‍ट २०२१ पासून सहा आठवडे फक्‍त वूटवर पाहता येणार आहे. रिअॅलिटी शोच्‍या सेलिब्रिटी निवासींमध्‍ये सामावून जाण्यास, त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यास किंवा त्‍यांच्‍यासोबत बॉसप्रमाणे […]

Mumbaitak
follow google news

करण जोहर हे स्‍वत: सर्वात मोठा वादग्रस्‍त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे चाहते आहेत. म्‍हणून ‘बिग बॉस ओटीटी’चा होस्‍ट बनणे हे या दिग्‍गज चित्रपटनिर्मात्यासाठी स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. हा शो टेलिव्हिजनवर प्रिमिअर होण्‍यापूर्वी ८ ऑगस्‍ट २०२१ पासून सहा आठवडे फक्‍त वूटवर पाहता येणार आहे. रिअॅलिटी शोच्‍या सेलिब्रिटी निवासींमध्‍ये सामावून जाण्यास, त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यास किंवा त्‍यांच्‍यासोबत बॉसप्रमाणे वागण्‍यास उत्‍सुक असले तरी करण यांची स्‍वत: घरामधील निवासी बनण्‍याची इच्‍छा नाही. बिग बॉस ओटीटी हाऊसमध्‍ये स्‍पर्धक म्‍हणून सहा आठवडे व्‍यतित करण्‍याबाबत विचारले असताना करण म्‍हणतात, ”सहा आठवडे घरामध्‍ये? मी एक तासही माझ्या फोनशिवाय राहू शकत नाही. विचार करा, मी एका तासामध्‍ये किती गोष्‍टी चुकवेन. अरे बापरे, माझी असे होण्‍याची जरादेखील इच्‍छा नाही.” नियमांनुसार कोणताही स्‍पर्धक घरामध्‍ये त्‍याच्‍यासोबत/तिच्‍यासोबत कोणतेही संप्रेषण डिवाईस घेऊन जाऊ शकत नाही. असे असेल तर, निश्चितच करण या रिअॅलिटी शोमध्‍ये कधीच स्‍पर्धक म्‍हणून दिसणार नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp