ADVERTISEMENT
गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये चर्चा सुरू असलेलं बॉलिवूडमधील एक हॉट कपल 9 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झालं.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा शाही विवाहसोहळा राजस्थानात पार पडला.
सगळ्यांचीच नजर असलेल्या या विवाह सोहळ्याबद्दल कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. मात्र, आता विकी कौशल आणि कतरिना कैफने आपल्या चाहत्यासाठी फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफने हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले असून, दोघेही प्रचंड आनंदी दिसत आहे.
कतरिना कैफ आणि आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा राजस्थानातील सवाई मधोपूर जिल्ह्यात असलेल्या हॉटेल सिक्स सेन्समध्ये पार पडला.
दोघांच्या हळदीचा कार्यक्रम आनंदात झाल्याचं फोटोतून दिसत आहे.
दोघांनाही लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी हळद लावली. विकी आणि कतरिना या दोघांचेही चेहरे हळदीने माखलेले दिसत आहे.
कतरिनानेही विकी कौशलच्या चेहऱ्याला हळद लावली. यावेळी टिपलेलं दोघांचं छायाचित्र त्यांच्यातील प्रेमाचीच साक्ष देत आहे.
या विवाह सोहळ्याला कतरिना कैफचे कुटुंबीय तसेच विकी कौशलचे कुटुबीयही हजर होते.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना दोघांनी विवाहबद्ध होत पूर्णविराम दिला आहे.
ADVERTISEMENT