Stree 2 Movie : Stree 2 चित्रपटाचे 'ते' सीन्स पाहिलेत का? राजकुमार रावने थेट Instagram वरच...

Stree 2 Deleted Scenes : अभिनेता राजकुमार राव स्टारर स्त्री-२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने १२ दिवसातच ४०३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवा मिळत आहे. परंतु, या मजेशीर चित्रपटातील काही सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाहीत

Stree 2 Deleted Scenes

Stree 2 Deleted Scenes

मुंबई तक

27 Aug 2024 (अपडेटेड: 27 Aug 2024, 09:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्त्री-२ चित्रपटाचे डिलिटेड सीन्स सोशल मीडियावर व्हायरल

point

राजकुमार रावने डिलिटेड सीन्सची पोस्ट केली शेअर

point

स्त्री-२ चित्रपटाने बॉस्क ऑफिसवर घातलाय धुमाकूळ

Stree 2 Deleted Scenes : अभिनेता राजकुमार राव स्टारर स्त्री-२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने १२ दिवसातच ४०३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवा मिळत आहे. परंतु, या मजेशीर चित्रपटातील काही सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे काहींची या चित्रपटातील हे सीन्स पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राजकुमार रावने इन्स्टाग्रावर जबरदस्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

हे वाचलं का?

राजकुमार बनला राजकुमारी

राजकुमार रावने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत राजकुमारने स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं असेल की, स्त्री-३ चित्रपटासाठी राजकुमारची तयारी सुरु आहे. पण असं काही नाही. कारण हा एक स्त्री-२ चित्रपटाचा सीन आहे. जो चित्रपटातून कापण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Badlapur News: 'तुझा रेप झालाय का?', असा आरोप असलेल्या वामन म्हात्रेंचं 'ते' CCTV फुटेज समोर


ही पोस्ट शेअर करत राजकुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं, हे चित्रपटातील माझे आवडते आणि सर्वात फनी सीन होते. परंतु, फायनल कटमध्ये या सीन्सचा चित्रपटात समावेश केला नाही. तुम्हाला ते सीन्स पाहायचे आहेत का? तुम्ही सर्व सांगा? याचसोबत राजकुमारने दिग्दर्शक अमर कौशिकला टॅग केलं आहे.राजकुमारचं हे कॅप्शन पाहिल्यावर असं वाटतं की, या सीन्ससोबत स्त्री-२ चित्रपट पुन्हा प्रदर्शीत करण्याचं प्लॅनिंग सुरु आहे.

कारण या चित्रपटाने गेल्या काही दिवसांपासून पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. जर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शीत झाला, तर चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होऊ शकते. राजकुमारच्या या पोस्टला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला स्त्री-२ चित्रपट पुन्हा पाहायचं आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. अभिनेता विजय वर्माने म्हटलंय, हे सीन पाहण्यासाठी मी पैसे खर्च करेन.

हे ही वाचा >> Mazi Ladaki Bahin Yojana : ठाण्याच्या 'या' भागातील 78000 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

    follow whatsapp