बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. माधुरी लवकरच एका वेब शोमध्ये दिसणार आहे. नेटफ्लिक्सने यावर्षीच्या वेब सिरीजबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. यामधील एक वेब शोमध्ये अभिनेत्री माधुरी दिक्षीत झळकणार आहे. माधुरीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक आहेत.
ADVERTISEMENT
‘फाइंडिंग अनामिका’ असं या वेब शोचं नाव आहे. दिग्दर्शक करण जोहरचं हे प्रोजेक्ट असून यामध्ये प्रेक्षकांना माधुरी दिक्षीतची अॅक्टिंग पहायला मिळणार आहे. नावावरूनच हा वेब शो सस्पेंस असल्याचं समजतंय. ‘फाइंडिंग अनामिका’ हा एक फॅमिली ड्रामा असून एका सुपरस्टारची पत्नी गायब होण्यावर शोची कथा आधारित आहे.
दरम्यान अभिनेत्री माधुरी दिक्षित हिनेही याबाबत तिच्या सोशल मीडियावरून माहिती दिलीये. ‘नेटफ्लिक्सच्या ‘फाइंडिंग अनामिका’ या वेब शोचा मी भाग असून मला हे सांगायला फार आनंद होतोय,’ असं मधुरीने म्हटलंय. यासोबतच तिने ‘फाइंडिंग अनामिका’मधील एक फोटोही शेअर केलाय.
‘फाइंडिंग अनामिका’मध्ये माधुरीसोबत संजय कपूर आणि मानव कौल देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. एका मोठ्या ब्रेकनंतर माधुरी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
ADVERTISEMENT