दक्षिणेचा सुपरस्टार विजय सेतूपती यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरु विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला केला आहे. यामुळे काही काळ विमानतळावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर नुकताच व्हायरल झालाय. या संपूर्ण घटनेत विजय सेतूपती यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीनुसार, विजय सेतूपती हे विमानतळावरील परिसरात आपल्या टीमसोबत चालत जाताना दिसत आहे. त्यावेळी त्याचवेळी एक अज्ञात व्यक्ती मागून धावत येऊन त्यांच्यावर हल्ला करताना दिसतो. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विजय सेतूपती यांना धक्का बसतो. मात्र काही वेळाने ते बरे होतात. यावेळी विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी त्याठिकाणी येतात. त्यानंतर ते त्या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतात. व्हिडीओ पत्रकार जनार्धन कौशिक यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.दरम्यान विजय सेतूपती हे बंगळूरुमधील एका चित्रपटाच्या शूटींगसाठी जात होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत आहे. बंगळूरु विमानतळावरील पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री घडली. विजय सेतूपतीच्या पर्सनल असिस्टंने त्याच्याकडे येणाऱ्या गर्दीला ढकलले. तेव्हा रागाच्या भरात त्या व्यक्तीने त्याला पाठीमागून लाथ मारली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
विजय यांचा ‘एनाबेले सेतूपती’ आणि ‘मास्टर’ हे दोन चित्रपट सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या भूमिकांमधून केली. पण २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हॅनिला कबड्डी कुझू’ या चित्रपटामुळे तो मोठा स्टार बनला. या चित्रपटानंतर मात्र त्याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे.
ADVERTISEMENT