Mangal Dhillon Died :ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याची घटना ताजी असतानाच, आता मनोरंजन विश्वाला आणखीण एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध हिंदी आणि पंजाबी अभिनेते मंगल ढिल्लोन (Mangal Dhillon) यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. कर्करोगाशी प्रदिर्घ लढा दिल्यानंतर मंगल ढिल्लोन यांचे निधन झाले आहे. मंगल ढिल्लोन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.या निधनानंतर आता मनोरंजनासह विविध स्तरातून मंगल ढिल्लोन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. (mangal dhillon passed away famous hindi punjabi actor dies after battling with cancer)
ADVERTISEMENT
मंगल ढिल्लोन (Mangal Dhillon) गेल्या अनेक महिन्यापासून लुधियानाच्या हॉस्पिटलमध्ये भरती होते. त्यांच्यावर उपचार सूरू होते. या उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली आहे. मंगल ढिल्लोन कॅन्सरशी लढा देत होते, मात्र हा लढा अपयशी ठरला आहे. विशेष म्हणजे येत्या 18 जूनला त्याचा वाढदिवस होता.मात्र वाढदिवसाच्या आठवड़्याआधीच मगल ढिल्लो यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
हे ही वाचा : जॅकी श्रॉफच्या पत्नीला लाखोंचा गंडा! प्रकरण काय?
अभिनयाची सुरुवात
मंगल ढिल्लोन (Mangal Dhillon) यांचा जन्म पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील शीख परीवारात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून झाले. होते. यानंतर ते उत्तर प्रदेशात शिफ्ट झाले. येथे ढिल्लोन यांचे पुढील शिक्षण लखीमपूरमध्ये झाले होते. मंगल ढिल्लोन यांनी 1980 मध्ये अॅक्टींगमधून पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स केला होता. दिल्लीत त्यांनी थिएटरमध्येही काम केले होते. 1986 मध्ये ढिल्लोन यांनी प्रसिद्ध टीव्ही शो कथा सागरमधून एंटरटेंमेंट इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. याच वर्षात त्यांनी दुसरा टीव्ही शो बुनियादमध्ये देखील अभिनय केला होता. यासह जुनून, किस्मत, द ग्रेट मराठा, पँथर, साहिल, मौलाना आझाद, मुजरिम हाजीर, रिश्ता, युग आणि नूरजहाँ साऱख्या अनेक टीव्ही शोमध्ये अभिनय केला होता.
टीव्ही शोसह मंगल ढिल्लोन (Mangal Dhillon) यांनी अनेक बॉलिवूड सिनेमात काम केले होते. खुन भरी मांग, जखमी औरत, दयावान, कहा है कानुन, नाका बंदी, दलाल, जानशीन सारख्या अनेक सिनेमात त्यांनी काम केले आहे. 2017 साली आलेल्या तुफान सिंह या सिनेमात मंगल ढिल्लोन शेवटचे दिसले होते.
दरम्यान मंगल ढिल्लोन (Mangal Dhillon) यांच्या निधनाने फॅन्सना धक्का बसला आहे. आता मनोरंजनसह विविध स्तरातून मंगल ढिल्लो यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
ADVERTISEMENT