ADVERTISEMENT
हिंदू धर्मात साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा सण आज देशभरात साजरा केला जात आहे.
आजच्या दिवशी सर्वसामान्य घरांत सोनं किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करण्याचा कल असतो.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बनारसी रेशीम साडीमध्ये खास फोटोसेशन केलं आहे.
साडी हा प्रत्येक भारतीय स्त्री साठी विक पॉईंट मानला जातो.
याला अभिनेत्रीही अपवाद नसतात. सोनालीला तर विविध साड्यांची चांगलीच हौस आहे.
अनेकदा सोनाली विविध प्रकारच्या साड्यांमधलं आपलं फोटोसेशन सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
तिच्या प्रत्येक फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत असतो.
बनारसी साडीतल्या सोनालीच्या अदांवरही तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कामगिरीत व्यस्त असलेल्या सोनाली कुलकर्णीचा आणखी एक सिनेमा तमाशा लाईव्ह हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT