ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टीतली सर्वात बिझी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीचं नाव समोर येतं.
चित्रपटांमधील कामापासून ते अनेक ब्रँडसाठी सोनाली ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करते.
सोनालीचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतो.
नऊवारी साडी आणि नाकात नथ हे कोणत्याही मुलीसाठी डेडली कॉम्बिनेशन मानलं जातं. या पारंपरिक वेशात प्रत्येक मुलगी रुबाबदार दिसते.
सोनालीने नुकतच एका ब्रँडसाठी खास नऊवारी साडी आणि नथ घालून फोटोशूट केलंय.
यातले काही खास फोटो सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
तिच्या या अदांवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच सोनालीचा झिम्मा आणि पांडू हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर येऊन गेले. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला.
याव्यतिरीक्त सोनाली आगामी काळात आणखी काही सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठी वाहिनीवर सोनालीच्या पांडू या सिनेमाचा आज वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीअर आहे. त्यामुळे सोनाली आज चांगलीच आनंदात आहे. आणखी फोटोंसाठी क्लिक करा
ADVERTISEMENT