ADVERTISEMENT
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचं विजेतेपद मिळवणारा विशाल निकम आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला विकास पाटील यांनी नुकतचं ज्योतिबा गडाचं एकत्र देवाचं दर्शन घेतलं.
बिग बॉसच्या घरातली दोघांचीही मैत्री ही चांगलीच गाजली होती. अनेक टास्कमध्ये या दोघांनीही आपला ठसा उमटवून दाखवला होता. घराबाहेर पडल्यानंतरही या दोघांमधलं जिव्हाळ्याचं नातं तसंच कायम आहे
बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये अनेकदा भांडणही झालं परंतू ही दोस्ती तुटायची नाय हे ब्रीदवाक्य या दोघांनी घराबाहेरही कायम ठेवलं आहे.
देवाचे आशिर्वाद घेतल्यानंतर विशाल आणि विकास
तिसऱ्या पर्वाचं विजेतेपद मिळवलेल्या विशालला २० लाख रोख आणि एक आकर्षक ट्रॉफी मिळाली आहे.
ADVERTISEMENT