बॉलिवूड गायक मिका सिंग (Bollywood singer Mika Singh) याने आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. अभिनेत्री राखी सावंतने (Rakshi Sawant) 17 वर्षांपूर्वी आपल्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याची विनंती मिकाने न्यायालयाला केली आहे. दोघांमधील मतभेद आता संपले असून आपण आता मित्र असल्याचा दावा मिका सिंगने केला आहे. (Bollywood singer Mika Singh has filed a petition in the Bombay High Court)
ADVERTISEMENT
राखी सावंतच्या संमतीने गुन्हा रद्द करण्याची याचिका आज (सोमवारी) न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि पी.डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली. राखीचे वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, राखी सावंत यांनी गुन्हा रद्द करण्यास संमती देणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागातून गहाळ झाले आहे. त्याचा शोधही लागला नाही. त्यानंतर खंडपीठाने त्यांना पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कोर्टात का माफी मागितली? काय आहे प्रकरण?
मिका सिंगच्या वकिलाने सांगितले की, “गेल्या 17 वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. सिंग यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी, आरोप निश्चित करणे बाकी आहे. सिंग आणि सावंत यांनी आपले मतभेद संपवले आहेत आणि आता ते मित्र आहेत. त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. सावंत यांच्या हरवलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांनी त्यांचे मतभेद मिटवले आहेत, त्यामुळे त्यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास हरकत नाही.
Sushan Singh Rajput ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं गँग लीडर बनून कमबॅक, म्हणाली…
काय घडलं होतं 17 वर्षांपूर्वी?
2006 मध्ये वाढदिवसाच्या पार्टीत, मिका सिंगने राखीला तिच्या संमतीशिवाय कॅमेऱ्यांसमोर जबरदस्तीने किस केले होते. मिकाने आपल्या चेहऱ्यावर केक न लावण्याविषयी सर्वांना सूचना दिली होती. पण राखीने मिकाच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर मिकाने राखीला धडा शिकवायचा ठरवले. यानंतर मिका सिंगला राखी सावंतचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती.
ADVERTISEMENT