कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढताना दिसतायत. बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच अभिनेता मिलिंद सोमणलाही कोरोनाची लागण झाली आहे. मिलिंदने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
मिलिंदने यासंदर्भात ट्विट केलं आहे. मिलिंदने ट्विटमध्ये टेस्ट पॉझिटीव्ह आहे. क्वारंटाईन असं लिहिलं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मिलींद एकदम फीट आणि फाईन आहे. मिलिंद नेहमी फिटनेस संदर्भातील व्हिडीयो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
आज अभिनेता आर माधवनला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आर माधवनने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. यावेळी माधवनने 3 इडियट्स सिनेमाचा संदर्भ देत मजेशीर ट्विट केलं आहे. तर बुधवारी अभिनेता आमिर खानला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT