Jane Dipika Garrett Miss Universe 2023 :यंदाची 72 वी मिस युनिव्हर्स (Miss Universe 2023 स्पर्धा ही निकारागुआची शेनिस पॅलासिओसने (Sheynnis Palacios) जिंकली. जगभरातील अनेक सौंदर्यवतींना मागे टाकत शेनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. या शेनिस पॅलासिओसची जगभरात चर्चा असताना आता मिस नेपाल जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett) देखील चर्चेत आली आहे. नेमकं या मिस नेपाल जेन दीपिका गॅरेटची चर्चा का होते आहे? हे जाणून घेऊयात. (miss universe 2023 miss nepal jane garret sheynnis palacios winner Miss Universe 2023)
ADVERTISEMENT
खरं तर गेल्या काही वर्षापासून मिस युनिवर्स स्पर्धेवर टिपिकल बॉडी टाईपला प्रमोट केल्याचा आरोप होत आहे. हाच पायंडा मोडत काढत यंदाच्या वर्षी मिस युनिवर्सने टिपिकल क्रायटेरीच्या उलट स्पर्धा आयोजित केली होती. याच स्पर्धेत नेपाळचे प्रतिनिधित्व करत जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett) सहभागी झाली होती. या स्पर्धेतील स्विमसूट राऊंडमध्ये तिने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
हे ही वाचा : Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो ‘टेबल’वर, राऊतांच्या ‘त्या’ फोटोने राजकारण पेटलं
स्विमसुट राऊंडमध्ये जेन ने रुबिन सिंगरने डिझाईन केलेला स्विमसूट परिधान केला होता. हा स्विमसुटवर शाईनी फिनिशचा टच देण्यात आला आणि कॉस्ट्युमही स्ट्रेचेबल होते. तसेय या आऊटफीटमध्ये प्लंजिंग नेकलाईन आणि पाठीवर कट आऊट डिझाईन होते. या आऊटफीटमध्ये ती खुपच सुंदर दिसत होती. हा स्विमसूट परिधान करून जेन ने रॅम्प वॉक केला आणि तिने आपली प्लस साइज बॉडी फ्लाँट केली.मिस युनिव्हर्स 2023 च्या मंचावर प्रेक्षकांनी जेन दीपिका गॅरेटचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तिचा आत्मविश्वास आणि शैली पाहण्यासारखी होती. जेन सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चेत आहे.
हे ही वाचा : धक्कादायक… मुंबईत सुटकेसमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, कशी केली हत्या?
विशेष म्हणजे या प्रसिद्ध स्पर्धेत सहभागी होणारी जेन ही पहिली प्लस साइज मॉडेल आहे. यासोबत तिने शरीराचा आकार, शरीराची सकारात्मकता आणि स्वीकारार्हता यासंबंधीच्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आहेत.
ADVERTISEMENT