मॉडेल जिममध्ये करायची एकच काम, जिम मालकाने थेट काढलं बाहेर!

मुंबई तक

27 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 02:42 PM)

Viral News: फक्त ग्लॅमरस कपडे घालून जिममध्ये फोटो काढत असल्याने जीम मधून काढून टाकल्याचा गंभीर आरोप शर्ल्स लार्सन या फिटनेस मॉडेलने केला आहे. ज्याची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

model used to post glamorous pictures of workout got kicked out by gym

model used to post glamorous pictures of workout got kicked out by gym

follow google news

Model Viral News: एका फिटनेस मॉडेलने (Fitness Model) असा दावा केला होता की ती शॉर्ट ड्रेस घालून जिममध्ये (Gym) जात असल्याने तिला जिममधून बाहेर काढण्यात आले होते. मॉडेलने शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर (instagram) अपलोड केले होते. ज्यानंतर तिच्यासोबत भेदभाव करत जिममधून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. (model used to post glamorous pictures of workout got kicked out by gym)

हे वाचलं का?

मॉडेलला जिममधून का बाहेर काढलं?

शर्ल्स लार्सन असे या मॉडेलचे नाव असून ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिला 50 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. येथे लार्सन तिच्या वर्कआउटचे फोटो शेअर करत असते. ज्यांना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. तिच्या या फोटोचे प्रचंड चाहते असल्याने ती नियमितपणे आपले फोटो आणि व्हिडीओ हे आपल्या चाहत्यांसाठी शेअर करायची.

 

अधिक वाचा- WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

पण अलीकडेच एका जिमने तिला थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या 6 वर्षांपासून ती या जिममध्ये वर्कआउट करत होती. लार्सनचे म्हणणे आहे की, जिम मालकाने इंस्टाग्रामवर तिचे शॉर्ट ड्रेसेसमध्ये वर्कआउट करतानाचे ग्लॅमरस फोटो पाहिले होते. त्यानंतर त्याने तिला जिममध्ये प्रवेश देऊ नका असं थेट आदेश आपल्या जीममधील कर्मचाऱ्यांना बजावले होते.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये फिटनेस मॉडेल लार्सन हिने लिहिले – ‘मला माझ्या येथील जिममधून काढून टाकण्यात आले. मी गेली 6 वर्षे या जिमची सदस्या होती. इंस्टाग्रामवर मी जीममधील ग्लॅमरस फोटो शेअर केल्यामुळे मला काढून टाकण्यात आले. या पोस्टसोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून जिममध्ये दिसत आहे. तसेच यावेळी तिच्या हातात डंबेल्सही आहे.

मॉडेलने जॉईन केली दुसरी जिम

या घटनेनंतर शर्ल्स लार्सनने आणखी एक जीम जॉईन केली आहे. यावेळी तिने सांगितले की, ‘मी एक मुक्त विचारांची, उत्साही आणि मैत्रीपूर्ण मुलगी आहे. काय घालायचं आणि काय नाही हे माझ्यावर अवलंबून आहे. मला इतरांचा आदर कसा करावा हे देखील माहित आहे.’

अधिक वाचा- Akanksha Dubey: अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप

लार्सनने तिचे काही फोटो देखील शेअर केले आणि लोकांना विचारले की, या कपड्यांमध्ये काय समस्या आहे, ज्यामुळे मला जिममधून बाहेर काढण्यात आलं असावं? लार्सनच्या या पोस्टवर आता शेकडो यूजर्सने आणि तिच्या फॉलोवर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही लोकांनी जिम मालकावर टीका केली, तर अनेक यूजर्सनी लार्सनची बाजू घेतली. एका युजरने लिहिले – सुंदर असण्यामुळे तिच्याशी भेदभाव करण्यात आला. दुसरा यूजर्स म्हणाला की, जिमला विनामूल्य प्रसिद्धी मिळाली.

अधिक वाचा- फक्त 4 दिवस बाकी…आजच पूर्ण करा ‘हे महत्वाचे काम,अन्यथा होऊ शकतो 10,000 रुपयांचा दंड!

दरम्यान, अशाप्रकारच्या वागणुकीमुळे अनेक जणांनी जिम मालकाला बरंच टार्गेट केलं आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

    follow whatsapp