Viral Video : छावा पाहिल्यानंतर सोनं शोधण्यासाठी अख्खं गाव एकवटलं! खोदकाम करायला सुरुवात केली अन्...

Chhaava, Burhanpur Viral Video : 'छावा' चित्रपट संपूर्ण देशभरात गाजला असतानाच एका व्हायरल व्हिडीओमुळं सर्वांच्याच भुवया उंचावून गेल्या आहेत.

Burhanpur Viral Video, Chhaava Movie

Burhanpur Viral Video, Chhaava Movie

मुंबई तक

• 12:55 PM • 08 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगडच्या गावकऱ्यांनी नेमकं काय केलं?

point

सोनं शोधण्यासाठी अख्ख गावं एकवटलं,घटनेचा व्हिडीओ व्हायरल

point

रात्रभर गावकऱ्यांनी शेतात केलं खोदकाम आणि...

Chhaava, Burhanpur Viral Video : 'छावा' चित्रपट संपूर्ण देशभरात गाजला असतानाच एका व्हायरल व्हिडीओमुळं सर्वांच्याच भुवया उंचावून गेल्या आहेत. मध्य प्रदेशमधील बुरहानपूर जिल्ह्यात असीरगड येथे शेत जमिनीत सोन्याची नाणी असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. शेतात सोनं आहे, अशी खबर मिळताच अख्खच्या अख्ख गाव सोनं शोधण्यासाठी एकवटलं. लहान मुले, वृद्ध, पुरुष, महिला सर्वच जण हातात मशाल आणि उपकरणे घेऊन शेतात सोनं शोधण्यासाठी खोदकाम करु लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. यापूर्वीही याच ठिकाणी सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली होती. परंतु, प्रशासनाच्या सूचनेनंतर लोकांनी येथील उत्खनन थांबवलं होतं. 

हे वाचलं का?

असीरगड गावात खजिना दडला असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेतली. हातात आधुनिक उपकरणे आणि टॉर्च घेऊन लोक शेतात खोदकाम करत असल्याचं या व्हिडीओ पाहायला मिळत आहे. प्राचिन काळात सैनिक त्यांचे अलंकार जमिनीत गाडून ठेवत असत, असं म्हटलं जातं. मात्र, असीरगड गावात खजिना असल्याचं अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी खजिना शोधण्यासाठी रात्रभर खोदकाम केलं. 

हे ही वाचा >> Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले? कबर नेमकी आहे तरी कुठे?

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, धुलकोट येथील लोकही नाणी शोधण्यासाठी असीरगडच्या शेतात खोदकाम करत होते. या भागात सोन्याची नाणी सापडतात, असं काही लोकांचं म्हणणं होतं. मुघल काळात वापरण्यात आलेली नाणी जमिनीत गाडली असल्याची अफवा पसरली होती.  त्यानंतर गावातील अनेक लोक त्याठिकाणी टॉर्च लावून नाणी शोधण्यासाठी एकवटले होते. 

खोदकाम केल्यानंतर गावकऱ्यांना सोनं सापडलं का? पाहा व्हायरल व्हिडीओ

हे ही वाचा >> Coma Patient Video : रुग्णालयानं सांगितलं पेशंट कोमात अन् तो चालत बाहेर आला... व्हायरल व्हिडीओचं प्रकरण काय?

सूत्रांच्या माहितीनुसार, असीरगड ऐतिहासिक शहर होते. 7 लाखांच्या आसपास या गावाची लोकसंख्या होती. विशेष म्हणजे या गावात लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबले बनवण्यात आले होते. युद्ध संपल्यानंतर सैनिक जेव्हा या ठिकाणी यायचे, तेव्हा मौल्यवान वस्तूंचा सर्व खजिना येथे लपवून ठेवत असे. खजिन सुरक्षित राहण्यासाठी ते जमिनीत गाडून ठेवायचे. त्यामुळे या ठिकाणी खोदका करून नाणी शोधायची आणि काही लोकांना त्या काळात ही नाणी सापडल्याचीही माहिती आहे. 

 

    follow whatsapp