Udaipur : राजवाड्यापेक्षाही भव्य दिव्य; परिणीती चोप्रा-राघव चड्ढा इथे करणार लग्न

मुंबई तक

06 Sep 2023 (अपडेटेड: 06 Sep 2023, 04:01 PM)

Raghav-Parineeti marriage : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यसाठी त्यांनी शाही थाटामाटाचे हॉटेलही बुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या विवाहाएवढेच ते हॉटेलही चर्चेत आले आहे.

Parineeti raghav marriage udaipur hotel

Parineeti raghav marriage udaipur hotel

follow google news

Raghav-Parineeti marriage : जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये (Hotel Leela Palace) 23 आणि 24 तारखेला आपचे खासदार राघव चड्ढा (raghav chadda) यांच्याबरोबर परिणिती चोप्रा (Parineeti chopra) विवाहबद्ध होत आहे. या हॉटेलमध्ये 200 पेक्षा जास्त पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विवाहसमारंभामध्ये 50 पेक्षा जास्त लोकं हे राजकीय नेते आहेत, तर काही व्यक्ती या मनोरंजन क्षेत्रातील येणार आहेत.

हे वाचलं का?

लीला पॅलेस आणि ओबेरॉय बुक

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणिती चोप्राबरोबर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ती राघव चड्ढा बरोबर विवाह बंधनात अडकणार आहे. या दोघांचे लग्न राजस्थानचे उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेस आणि ओबेरॉय उदयविलासमध्ये होणार आहे.राघव आणि परिणितीच्या लग्नासाठी ही दोन्ही हॉटेल बुक झाल्यानंतर हॉटेलमध्येच सगळ्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

हे ही वाचा >> MP Bjp-Congress: भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेवर तुफान दगडफेक, वाहनांचे नुकसान

मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती

या विवाहाला आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर परिणितीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोन्सबरोबर उपस्थित राहून या लग्नाची शोभा वाढवणार आहेत.
चड्ढा आणि चोप्रा यांच्या विवाहानिमित्त उदयपूरमध्ये आता जोरदार धामधूम सुरु आहे.

राजवाड्यापेक्षाही भव्यदिव्य असणाऱ्या हॉटेलमध्ये होणार आहे परिणिती आणि राघव चड्ढा यांचा विवाह.

रिसेप्शन गुरुग्रामध्ये

23 सप्टेंबरला हळदी आणि मेंहदीचा कार्यक्रम होणार, तर त्याच दिवशी महिलांच्या संगीताचा कार्यक्रम होणार आहे. विवाहानंतर गुरुग्रामध्ये रिसेप्शन असणार आहे. या बड्या दोन हॉटेलबरोबरच त्याच परिसरातील तीन हॉटेल्सही बुक केली आहेत. परिणीती-राघवच्या विवाह समारंभ लीला पॅलेसमध्ये होणार तर पाहुण्यांसाठी उदयविलास हॉटेल बुक केले गेले आहे.

    follow whatsapp