Parineeti-Raghav चा शाही साखरपुडा! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी, असणार खास मेन्यू

मुंबई तक

• 11:07 AM • 13 May 2023

आता बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातील एक क्यूट-यंग कपल लवकरच आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे. हे कपल दुसरं-तिसरं कुणी नाही तर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती आणि आप खासदार राजघव चड्ढा हे आहेत.

Mumbaitak
follow google news

Parineeti-Raghav Engagement: आता बॉलिवूड (Bollywood) आणि राजकीय वर्तुळातील (Political Circle) एक क्यूट-यंग कपल लवकरच आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे. हे कपल दुसरं-तिसरं कुणी नाही तर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती आणि आपचे खासदार (AAP MP) राघव चड्ढा हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार आता दोघंही संसार थाटण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. 13 मे रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे. प्रत्येकजण त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत आहेत. परिणीती आणि राघव हे दोघेही दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा करणार आहेत. (Parineeti-Raghav get ready for their engagement in grand style VIP guests invited and royal food organized)

हे वाचलं का?

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याच्या थीमबद्दल बोलायचे झाले तर ते पूर्णपणे बॉलिवूडवर आधारित असणार आहे. हा साखरपुडा सोहळा खूप भव्य असेल.

Karnataka: ‘फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे..’, शिंदेंचं नाव घेत पवारांनी भाजपला डिवचलं!

परिणीती-राघव यांचे आउटफिट कोणत्या डिझायनरने डिझाइन केले?

परिणीती साखरपुड्यासाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला आउटफिट घालणार आहे. अनेक कारागिरांनी मिळून ते तयार केले आहे. परिणीतीचा हा आउटफिट खास असणार असल्याचे बोलले जात आहे. याची तिने स्वतःच्या आवडीनुसार रचना केली असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, राघव हे पवन सचदेवने डिझाइन केलेला आउटफिट घालणार आहेत. पण, आउटफिटच्या रंगाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे

परिणीती-राघव यांच्या साखरपुड्याचे कसे असणार नियोजन?

साखरपुडा सोहळा भव्य असणार आहे. 13 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचे कळते. ही वेळ थोडी मागे-पुढेही असू शकते. कार्यक्रमाची सुरुवात सुखमणी साहिब पाठाने आणि अरदास केल्यानंतर होईल. दोघेही अतिशय आध्यात्मिक आहेत. अशा स्थितीत त्यांनी ठरवले आहे की प्रथम देवाचे आभार मानायचे, त्यानंतर पुढील नवीन सुरूवात करण्यात येईल. थाटामाटात तयारी करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाही पक्वानांचीही सोय आहे.

साखरपुडा सोहळ्याला कोणते बॉलिवूड-राजकीय पाहुणे हजेरी लावणार?

परिणीती चोप्रा ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.ती चित्रपटांव्यतिरिक्त रिअॅलिटी शोमध्येही खूप अॅक्टिव्ह दिसते. तिने जज म्हणून शो होस्ट केले आहेत. परिणीतीमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. कारण बॉलिवूडमध्ये तिचे खूप नाव आहे, इंडस्ट्रीतून अनेक मोठी नावे समोर येत आहेत जी तिच्या साखरपुड्याला हजेरी लावणार आहेत. सर्वात आधी परिणीतीचा चांगला मित्र करण जोहरच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय परिणीतीची लाडकी मोठी बहीण प्रियांका चोप्रा देखील असेल. ती पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी जोनससोबत परदेशातून भारतात येणार असल्याचे म्हटले जात आहे. परिणिती आयुष्यातील बदल आणि नवीन सुरुवातीबद्दल खूप उत्साहित दिसत आहे.

Karnataka election results live : भाजपची दक्षिणेतील सत्ता गेली, काँग्रेसला ‘जनादेश’

दुसरीकडे, राघव चड्ढा यांच्या वतीने पाहुण्यांची यादी पाहिली तर त्यात पहिले नाव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील या दोघांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. एकंदरीत सुमारे दीडशे लोक या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे समजते. त्यात सर्व दिग्गज लोक असतील.

 

 

    follow whatsapp