सोशल मीडियावर आजकाल अनेक गोष्टी ट्रेंड होत असतात. असंच सध्या ‘पावरी हो रही है’ हा पाकिस्तानी स्टार दनानीर मुबीरचा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हीडियोला अनेक सेलिब्रिटींनी आपला व्हीडियो बनवला आहे. यानंतर आता मराठी अभिनेत्री प्रिया बापट हीने तिचा खास पावरी व्हीडियो तयार केला आहे.
ADVERTISEMENT
नुकतंच प्रिया बापटने एक फोटोशूट केलं. हे फोटोशूट करताना तिने हा पावरी वाला व्हीडियो शूट केला आहे. प्रियाने हा व्हीडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हीडियोला कॅप्शन देताना ‘जेव्हा काम पावरीसारखं वाटतं तेव्हा’ असं कॅप्शन दिलं आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हीडियोमध्ये प्रिया म्हणते, ये में हूँ, ये मेरी टीम है और ये हमारी पावरी हो रही. मुख्य म्हणजे या व्हीडियो बनवाताना प्रियालाही हसू आवरलेलं नाही. तिचा हा व्हीडियो फॅन्सना मात्र खूप भावला आहे.
लवकरच प्रिया बापट एका इंटरनॅशनल सिनेमात झळकणार आहे. आदित्य क्रिपलानीचा हा सिनेमा असून याचं शूटींग सिंगापूरमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे सिटी ऑफ द ड्रीमच्या पुढच्या सिझनमध्येही प्रिया दिसणार आहे. नुकतंच तिने या सिरीजचं शूटींग पूर्ण केलं आहे.
ADVERTISEMENT