देशभरात आज 30 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त प्रत्येक बहिण तिच्या भाऊरायाला राखी बांधत असते. या सणासाठी बहिणी खूप आधीपासून तयारी करत असतात. कोणते कपडे परिधान करायचे, कोणते दागिने घालायचे. पण सध्या मार्डन जमाना आहे, त्यामुळे मुलींनी व विवाहितांनी या सणानिमित्त कपडे निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे.आता विवाहितांनी रक्षाबंधनाला कोणते कपडे परिधान केले पाहिजेत, हे जाणून घेऊयात. (raksha bandhan 2023 married sister should not wear these kind clothes read full story)
ADVERTISEMENT
नेकलाईन ब्लाऊज नको
सध्या ब्रालेट आणि प्लंजिंग नेकलाईन ब्लाऊज बालिवूड अभिनेत्रींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक विवाहित महिला अशाप्रकारचे आऊटफीट परिधान करणे पसंत करतात. पण विवाहितांनी रक्षाबंधनाला असे कपडे परिधान करणे टाळले पाहिजे.
शॉर्टस टाळा
अनेक मॉर्डन कुटुंबियातील महिला अथवा तरूणी सणासुदीला शॉर्ट्स घालणे पसंत करतात. जर तुम्ही शॉर्टस घालत असाल तर ते कपडे जास्तच शॉर्ट असू नयेत. विशेष म्हणजे कुटुंबियांसोबत बसता- उठताना तुम्हाला अडचण येता कामा नये. तसेच शक्य असेल तर अशा दिवशी शॉर्टस टाळा.
हे ही वाचा : Raksha Bandhan 2023: राखी बांधण्यासाठी फक्त ‘एवढ्याच’ तासांचा मुहूर्त, वेळ चुकवू नका!
असे सूट घालू नका
जर तुम्ही रक्षाबंधनाला सुट घालण्याचा विचार करत असाल तर त्याबाबत काही गोष्टी लक्षात ठेवा. उदा: या सुटसारखी नेकलाईन घालू नये,जी इतकी डिपनेक असेल. याचसोबत पाठ देखील जास्त खोल नसावी. रक्षाबंधनाला अशाप्रकारच्या नेकलाईनमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.
फिगर हगिंग क्लोद्स
रक्षाबंधनाला विवाहित महिलांनी असे फिगर हंगिग क्लोद्स टाळले पाहिजेत. पब किंवा पार्टी सारख्या ठिकाणी असे कपडे चांगली चॉईस असू शकते. पण रक्षाबंधनाला अशा कपड्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे शक्यतो असे फिगर हगिंग क्लोद्स रक्षाबंधनाला टाळा.
स्कर्ट घालू नये
रक्षाबंधनाला जर तुमचा स्कर्ट घालण्याचा विचार असेल तरी ती खुप छोटी, घट्ट किंवा हाय स्लिट स्कर्ट नसावी. तरूणींवर हे स्कर्ट खूप चांगले दिसत असतील, पण लग्न झाल्यावर सणासुदीला स्कर्ट घालणे हा चांगला पर्याय नाही आहे.
खरं तर बहिण-भावाच्या नात्याचा हा सण आहे. हा सण आपण एकत्र कुटुंबात साजरा करत असतो. त्यामुळे कुटुंबासमोर शक्यतो ट्रेडिशनल कपडे परिधान करुन हा सण साजरा केल्यास फायद्याचे ठरेल.
ADVERTISEMENT