अण्णा नाईक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर सुरु होणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे आता या मालिकेचा तिसरा भागंही लवकरच येणार आहे. नुकतंच रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
झी मराठी चॅनेलने इन्स्टाग्रामवरून हा प्रोमो रिलीज केला आहे. हा प्रोमो शेअर करत “अण्णा नाईक…. परत येणार!!! ‘रात्रीस खेळ चाले 3’ लवकरच….” असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. यापूर्वी मालिकेचं एक मोशन पोस्टर शेअर करत मालिकेचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा केली होती. तर आता मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या मालिकेच्या प्रोमोमध्ये 3 लहान मुलं एका विहीरीत डोकावून पाहताना दिसतायत. यावेळी विहीरीत अण्णा नाईक असा ओरडल्यावर परत येणार असा भयानक आवाज ऐकू येतो. प्रेक्षकांनाही हा प्रोमो फार आवडला असून अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्स केलेत.
मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये शेवंता हिचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तर आता तिसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागलीये. तिसऱ्या सिझनमध्ये कोणते कलाकार असणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र माधव अभ्यंकरच अण्णा नाईक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अण्णा नाईक यांचा दरारा पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT