अण्णा नाईक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर सुरु होणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिजनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे आता या मालिकेचा तिसरा भागंही लवकरच येणार आहे.
ADVERTISEMENT
झी मराठी चॅनेलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अण्णा नाईक परत येणार, लवकरच…! अशी ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी अण्णा नाईक यांचा एक मोशन पोस्टर देखील शेअर केला आहे. यावरून रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तीसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समजतंय.
रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये खूनाचा थरार आणि भास या गोष्टींमुळे कथा फार रहस्यमय होती. या मालिकेचा पहिला सिझन हा सीक्वेल होता तर दुसऱ्या सिझन प्रिक्वेल होता. तर आता येणारा तिसरा सिझन फार गूढ आणि रहस्यमय असणार आहे अशी चर्चा आहे. चाहते देखील या रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये शेवंता हिचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तर आता तिसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागलीये. तिसऱ्या सिझनमध्ये कोणते कलाकार असणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र माधव अभ्यंकरच अण्णा नाईक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अण्णा नाईक यांचा दरारा पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT