कुणाची उडाली झोप तर कुणाला आठवली संस्कृती… बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर होतेय ट्रोल!

रोहिणी ठोंबरे

• 10:52 AM • 06 Jan 2024

मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपली एक ओळख बनवत प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Saie Tamhankar Photoshoot : मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपली एक ओळख बनवत प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. मराठी सिनेमात (Marathi Cinema) बिकीनी घालणारी ती पहिली अभिनेत्री आहे. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. सध्याही सई चर्चेत असण्याचं कारण असंच काहीसं आहे. (Saie Tamhankar is once again getting trolled on social media due to bold photoshoot)

हे वाचलं का?

सई ताम्हणकर (Saie Tamhankar) तिच्या बोल्ड-बिंधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आताही तिने नुकतंच एका हॉट फोटोशूटमुळे नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. सईने पेस्टल रंगाच्या बिकनी ड्रेससह विंटर जॅकेट कॅरी केलं आहे. यामध्ये तिच्या मादक अदा चर्चेचा विषय ठरत आहेत.

वाचा : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या थरारक हत्याकांडाचे CCTV फुटेज आलं समोर, नेमकं काय घडलं?

या ड्रेसमध्ये सईने तीन फोटो पोस्ट करत त्यांना वेगवेगळे कॅप्शन्स दिले आहेत. ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सईचा चाहता वर्ग या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत तर काहींच्या नजरेत हे खटकलं आहे. यापूर्वीही तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

वाचा : नवऱ्याच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचं सुसाईड, अंत्यसंस्कारानंतर वेगळंच सत्य आलं समोर

सईला ट्रोल करत एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘सई मावशी वेस्टर्न संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती भारी’ तर, दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘कपडे घाला प्लीझ, संस्कृती जपा.’ अशी कमेंट केली. तसंच, नम्रता संभेराव, प्रार्थना बेहेरे, मधुराणी प्रभुलकर या अभिनेत्रींनी सईच्या फोटोंवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. मधुराणीने तर प्रभावित होऊन ‘अशक्य’ अशी कमेंट केली आहे. सईने सध्या या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं असून एकालाही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    follow whatsapp