Salman Khan Emotional : बिग बॉसच्या स्टेजवर सलमान भावूक, म्हणाला मला इथं यायचं नव्हतं, पण...

मुंबई तक

19 Oct 2024 (अपडेटेड: 19 Oct 2024, 05:40 PM)

Salman Khan Bigg Boss मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा आणि सलमानचा सलमान खान आणि त्याचं कुटुंब मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे सलमान बिग बॉसच्या विकेंडचा वार या कार्यक्रमाला येणार नाही असं चाहत्यांना वाटत होतं.

बिग बॉसच्या स्टेजवर सलमान भावूक

बिग बॉसच्या स्टेजवर सलमान भावूक (फोटो सौजन्य : Colors TV)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेता सलमानने शूटींग थांबवलं नाही?

point

सिद्दीकींच्या हत्येनंतर पहिल्यांदाच काय म्हणाला सलमान?

point

सलमान खान भावूक? चाहत्यांमध्ये चर्चा

Salman Khan Bigg Boss मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूच्या धक्क्यामध्ये आहे. तर दुसरीकडे सध्या सलमान खानचा बहुचर्चित बिग बॉस हा कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. आठवडाभरापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यामुळे आता सलमान खान 'विकेंड का वार' या भागासाठी उपस्थित राहणार का? यावर अनेकांचं लक्ष लागून होतं. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा आणि सलमानला दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा थेट संबंध जोडला जात असल्यानं सलमान खान आणि त्याचं कुटुंब मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे सलमान बिग बॉसच्या 'विकेंडचा वार' या कार्यक्रमाला येणार नाही असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून सलमान या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं समोर आलंय. (Salman Khan emotional on bigg boss weekend ka war amid baba Siddique shot by Lawrence Bishnoi gang)

हे वाचलं का?

हे ही वाचा >> IRS अधिकारी समीर वानखेडेंची 'ही' मोठी अडचण, नेमकं घडलंय तरी काय?

 

अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारानंतर सलमान खानचं कुटुंब चिंतेत होतं. त्यातच अलीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याने सलमान खानचं  कुटुंब चिंतेत आहे. तर दुसरीकडे सलमान खान प्रसिद्ध अशा बिग बॉस या कार्यक्रमाचा होस्ट सुद्धा आहे. दरआठवड्याच्या शनिवार आणि रविवारी होणाऱ्या विकेंड का वार या कार्यक्रमातला तो अविभाज्य भाग असतो. मात्र बाबा सिद्दीकींच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे तो येणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र सलमान खान या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि त्यानं आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

https://www.instagram.com/p/DBTG0Bnt9jE/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

 

समोर आलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये सलमान खान अत्यंत भावूक दिसतोय. या व्हिडीओमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना सलमान अप्रत्यक्षपणे आपल्या भावना व्यक्त करताना दिसला. बिग बॉसमध्ये असलेल्या स्पर्धक शिल्पाला तो म्हणतो की, तुझी मुलगी जेवणावर राग काढते, तेव्हा तू तिला काय म्हणाले??? त्यावर शिल्पा म्हणाली, की माझा राग जेवणावर नव्हता, तर त्याच्यावर अॅटीट्यूडवर राग होता सर...तेव्हा उत्तरात सलमान म्हणतो की, "आय हेट टीअर्स शिल्पा... या घरात भावनांशी कुठलंही नातं ठेवू नका... जसं आज माझी अशी भावना आहे की, मला या घरात यायचं नव्हतं, पण यावं लागतं, कारण आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडावंच लागतं..."

हे ही वाचा >> Baba Siddique Case : आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडला बाबा सिद्दींकीच्या मुलाचा फोटो, स्नॅपचॅटवरुन...

एकूणच मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे सलमान खानही अत्यंत भावूक झाल्याची चर्चा सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. तसंच सलमान खानने बिग बॉसचं शूटींग थांबवल्याच्या चर्चांनाही आता पूर्नविराम लागलाय. 


 

    follow whatsapp