Maharashtra Assembly Election : लॉरेन्स बिश्नोईला 'या' पक्षाकडून थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची ऑफर!

मुंबई तक

21 Oct 2024 (अपडेटेड: 21 Oct 2024, 10:42 PM)

Maharashtra Assembly Election, Lawrence bishnoi : महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सध्या उमेदवारी यादी घोषित करण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 8 दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपांसाठी बैठका सुरू आहेत. त्यातच आता एका पक्षाने थेट कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईला आपल्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे.

maharashtra assembly election 2024 lawrence bishnoi offer to contest maharashtra vidhan sabha election

लॉरेन्स बिश्नोईला एका पक्षाने थेट उमेदवारी ऑफर करण्यात आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

लॉरेन्स बिश्नोईला निवडणूक लढण्याची ऑफर

point

या पक्षाने दिली ऑफर

point

थेट पत्र लिहून लॉरेन्ससा निवडणुकीची ऑफर

Maharashtra Assembly Election, Lawrence bishnoi : गुन्हेगारीच्या जगतातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मागच्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं आढळून आलंय. अलीकडेच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईचा थेट संबंध आढळून आलाय. काही दिवसांपूर्वी सलमान खानला आलेली धमकी आणि त्यानंतर सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातही लॉरेन्स बिश्नोई गँगचाच थेट संबंध असल्याचं समोर आलं होतं. उत्तरेकडे गाजलेलं सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणही लॉरेन्स गँगनेच घडवून आणल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या प्रकरणांच्या केंद्रस्थानी असलेलं लॉरेन्स बिश्नोई हे नाव सध्या ट्रेंडमध्ये आहे. जेलमधून टोळी चालवत असलेल्या या गुन्हेगाराचं उदात्तीकरण करायलाही आता अनेकजण पुढे येताना दिसतायत. यातलाच एक प्रकार आता समोर आलाय. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजलेत. यातच आता लॉरेन्स बिश्नोईला एका पक्षाने थेट उमेदवारी ऑफर करण्यात आली आहे. (maharashtra assembly election 2024 lawrence bishnoi offer to contest maharashtra vidhan sabha election) 

हे वाचलं का?

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सध्या उमेदवारी यादी घोषित करण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 8 दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपांसाठी बैठका सुरू आहेत. त्यातच आता एका पक्षाने थेट कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईला आपल्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे. उत्तर भारतीय विकास सेना नावाने नोंदणीकृत असलेल्या एका पक्षाने थेट लॉरेन्स बिश्नोईला निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Assembly Election : अजित पवारांविरूद्ध उमेदवार ठरला, वंचितची पाचवी यादी जाहीर

उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी थेट पत्र लिहून लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रातून निवडणुकीची ऑफर दिली. सुनील शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत निवडणूक लढण्यासाठी आपल्या 4 उमेदवारांची यादी फायनल झाली आहे. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईच्या परवानगीनंतर उर्वरीत 50 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या पत्रामध्ये असंही म्हटलं आहे की, "आम्हाला गर्व आहे की तुम्ही पंजाबमध्ये जन्मलात, उत्तर भारतीय आहात, आम्ही उत्तर भारतीय सेना नावाने एक नोंदणीकृत पक्षाच्या माध्यमातून उत्तर भारतीय नागरिकांच्या अधिकारांसाठी काम करत असतो."

लॉरेन्स बिश्नोईला लिहिलेल्या या पत्रात पुढे सुनील शुक्ला यांनी असंही म्हटलं आहे की, "आम्ही तुमच्यात शहीद भगतसिंग यांना पाहतो. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंडसह इतर पाच राज्यांतून आलेल्या लोकांना महाराष्ट्रात आरक्षणापासून वंचित ठेवलं जातं. कारण एवढंच की फक्त त्यांचे पूर्वज उत्तर भारतीय होते. जर एक भारत आहे तर आपण या अधिकारांपासून वंचित का?"

    follow whatsapp