मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले याने त्याच्या अभिनयाची छाप बॉलिवूडमध्येही सोडली आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये राबवलेल्या जनजागृती मोहीमे सौरभ सहभागी झाला होता. यावेळी रस्त्यावरील प्राण्यांना दत्तक घेण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. अॅनिमल अडॉप्शन ऑफ रेस्क्यू टीम आणि बालेवाडीतील ऑर्चिड हॉटेलतर्फे ही मोहीम राबवण्यात आली होती.
ADVERTISEMENT
या जनजागृती मोहिमेत कुत्र्याची पिल्लं तसंच मांजरींच्या पिल्लांना मोफत दत्तक दिलं जातं होतं. दत्तक घेणाऱ्या प्रत्येक प्राण्यांची पशुतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना सौरभ म्हणाला, “माझ्याकडे चार कुत्रे असून मी त्यांचं पालकत्व स्विकारलंय. यामध्ये किती आनंद मिळतो हे देखील मला माहित आहे. रस्त्यावरील अशा कुत्र्यांना अडॉप्ट करण्यासाठी अधिकाअधिक लोकांनी पुढे यायला पाहिजे. जेणेकरून त्यांनाही घर मिळेल.”
ADVERTISEMENT